AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावातील महिला आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

एखाद्या समाजामध्ये अशा काही विशिष्ट प्रथा परंपरा पाळल्या जातात, त्यामुळे तो समाज चर्चेत येतो. अशाच एका प्रथेचं शेकडो वर्षांपासून पालन करण्यात येत आहे, ते म्हणजे या महिला आपल्या आयष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात.

या गावातील महिला आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 5:00 PM
Share

जगामध्ये अशा अनेक प्रथा परंपरा आहेत, ज्याच्या विशेष वैशिष्ट्यांमुळे त्या कायम चर्चेत असतात. एवढंच नाही तर या प्रथा परंपरांचं पालन ज्या समाजात केलं जातं, तो समाज देखील अशा प्रथांमुळे चर्चेत येतो. अशा अनेक प्रथा, परंपरा असतात, ज्या मागे काही तरी विशिष्ट कारण असतं, परंतु अशाही काही प्रथा परंपरा पहायला मिळतात, ज्या मागे काही ठोस कारण नसतं, मात्र तरी देखील विशिष्ट संप्रदाय त्या प्रथा परंपरेचं वर्षानुवर्ष पालन करत असतो.

आफ्रिकेमध्ये देखील असा एक समाज आहे, ज्या समाजामध्ये एका विचित्र प्रथेचं पालन केलं जातं. या समाजातील महिलांना सर्वात सुंदर मानलं जातं. परंतु या समाजातील महिला आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच आंघोळ करतात. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, परंतु हे खरं आहे, या समाजातील महिला आपल्या आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात. त्यानंतर त्या आपल्या आयुष्यात पुन्हा कधीही अंघोळ करत नाहीत. ते म्हणजे या महिला फक्त आपल्या लग्नाच्या दिवशीच अंघोळ करतात.

आफ्रिकेमध्ये आदिवासी समाजाच्या अनेक जातींचं लाखो वर्षांपासून वास्तव्य आहे. प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या प्रथा परंपरा पाळल्या जातात, यातीलच एक जात आहे, ती म्हणजे हिंबा जात. या समाजातील महिला आपल्या आयुष्यात फक्त एकदाच लग्नाच्या दिवशी अंघोळ करतात. तसेच त्या इतरवेळी आपलं शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी विशिष्ट वनस्पतीचा लेप लावतात. या जातीमध्ये महिलांना खूप स्वातंत्र्य असतं. लग्न झाल्यानंतर देखील या महिला इतर पुरुषांसोबत शारीरीक संबंध ठेवू शकतात.

दक्षिण आफ्रिकेच्या मोजक्या गावांमध्ये आणि दुर्गम प्रदेशात या लोकांचं वास्तव्य आहे. विशेष म्हणजे या समाजाची लोकसंख्या अवघी काही हजारांमध्येच या जगात आता शिल्लक आहे. या समाजातील मुलीचं किंवा मुलाचं कधीही समाजाबाहेर लग्न होत नाही. समाजाबाहेर लग्न केल्यास संबंधित व्यक्तीवर बहिष्कार घातला जातो. त्यांचे सण समारंभ साजरा करण्याचे नियम देखील खूपच वेगळे आहेत. आफ्रिकेमध्ये पाण्याची कमतरता असते, त्यामुळे ही प्रथा त्या काळात तिथे सुरू झाली असावी, असा अंदाज आहे.

Follow Us
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली
राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
Raj Thackeray UNCUT Speech | राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...