AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाकडून तेल खरेदी बंद, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे मोठे संकट, थेट खळबळ, अमेरिकेने..

इराण आणि अमेरिका युद्धात भारताकरिता अत्यंत वाईट बातमी आहे. भारतात पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. अमेरिकेच्या एका निर्णयाने पार वाट लागल्याचे बघायला मिळत आहे. भारताला ज्याची भीती होती तेच घडल्याचे बघायला मिळत आहे.

रशियाकडून तेल खरेदी बंद, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे मोठे संकट, थेट खळबळ, अमेरिकेने..
Petrol and diesel
| Updated on: May 17, 2026 | 1:53 PM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाची झोप उडवणारा निर्णय घेतला. ज्याने मोठे संकट येऊ शकते. जागतिक बाजारात हाहाकार उडाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या एका निर्णयाने पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनांच्या किमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. अगोदरच पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत असताना आता पुन्हा संकट निर्माण झाले. त्यामध्येच भारताविरोधात हा अत्यंत मोठा निर्णय असल्याचे बोलते जातंय. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीमुळे भारतात मोठी महागाई येऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या तेलावरील निर्बंधांना सूट देण्यास नकार दिला. रशियाच्या तेलावर पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आली. ज्यामुळे भारतासह अन्य देशांना रशियाकडून तेल खरेदी करता येणार नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. त्यामध्येच या काळात भारताच्या मदतीला रशिया धावून आला. भारताला हवे तेवढे तेल रशियाकडून पुरवले जात होते.

आता पुन्हा रशियाच्या तेलावर निर्बंध घालण्यात आल्याने भारतात मोठा हाहाकार उडाला. भारतात तेलाची मोठी मागणी आहे. रशियातून भारताच्या दिशेने तेलाचा पुरवठा सुरू होता. मात्र, आता रशियाच्या तेलावर निर्बंध अमेरिकेने पुन्हा घातली सूट दिली नाही. ज्यामुळे भारताचे टेन्शन वाढले असून तेल नक्की आणायचे कुठून आणि कसे हा गंभीर प्रश्न निर्माण आहे.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवरील तात्पुरती सूट वाढवण्यास नकार दिला आहे. फक्त भारतच नाही तर जागतिक बाजारही यामुळे संकटात आहे. तेलावरील दबाव अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत. पश्चिम आशियातील संकट आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावाच्या काळात रशियाकडून सातत्याने तेल खरेदी करणाऱ्या भारतासाठी हा खरोखरच अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागणार आहे.

सर्वांना अपेक्षा होती की, सध्या जी परिस्थिती आहे, त्यात अमेरिका पुढील काही दिवसांकरिता रशियाच्या तेलावरील सूट काही दिवसांकरिता पुढे ढकलेल. मात्र, प्रत्येक्षात तसे घडले नाही. यामुळे आता भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. मोठे संकट भारतापुढे उभा असल्याचेही बघायला मिळत आहे.

Follow Us
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?