AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात हाहाकार! अमेरिकेचे जगाला उद्धवस्थ करणारे पाऊल, विमानांनी भरली उड्डाण, थेट..

इराण आणि अमेरिका संघर्ष टोकाला पोहोचलेला असतानाच धक्कादायक घडामोडी घडत आहेत. अमेरिकेने मोठा निर्णय घेतला. ज्याने जगाची झोप उडाली. कोणत्याही क्षणी 28 फेब्रुवारीपेक्षा भयंकर हल्ला इराणवर होऊ शकतो, तशी तयारी सुरू आहे.

जगात हाहाकार! अमेरिकेचे जगाला उद्धवस्थ करणारे पाऊल, विमानांनी भरली उड्डाण, थेट..
Donald Trump
| Updated on: May 17, 2026 | 12:29 PM
Share

अमेरिकेने 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर मोठा हल्ला केला. तिथेच युद्धाला सुरूवात झाली. इराणनेही अमेरिकेचे लष्कर बेस ज्या आखाती देशात आहेत, अशा ठिकाणी मोठे हल्ले केले. या युद्धाची झळ जगाला बसत आहे. आता अमेरिका पुन्हा एकदा धक्कादायक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. 28 फेब्रुवारी रोजी ज्या पद्धतीने मोठा हल्ला इराणवर करण्यात आला, तसाच मोठा आणि त्यापेक्षा कितीतरी भयंकर हल्ला इराणवर करण्याच्या तयारीत अमेरिका आहे. तशी तयारीही जवळपास झालीये. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे 11 एअरफोर्स सी 17 ए विमान मध्य आशियाहून युरोपच्या दिशेने रवाना झाले. 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यापूर्वी अशाच घडामोडी घडताना दिसल्या होत्या. न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिका आणि इस्त्रायलच्या सैन्य अधिकाऱ्यांकडून मोठ्या हल्ल्याची तयारी केली जात आहे.

पेंटागनने काही प्लॅन आखली आहेत. या हल्ल्यात युरेनियम भंडारला टार्गेट केले जाणार असल्याची माहिती आहे. 12 दिवसांच्या युद्धात अमेरिकेने इराणच्या परमाणु ठिकाणे नष्ट केली. मात्र, युरेनियम जमिनीच्या खाली आहे. अशा परिस्थितीमध्ये अमेरिका आपले सैन्य इराणच्या जमिनीवरही उतरू शकते. चीनच्या दाैऱ्याहून आल्यावरही डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणला धमकी दिली.

इराणने जर करार केले नाही तर ते इराणला संपून टाकतील. इराणसोबतचा युद्धविराम नाजूक स्थितीत आहे. यावर इराणकडूनही प्रतिक्रिया आली आहे. इराणने म्हटले की, अमेरिकेने जर आमच्यावर आता पुन्हा हल्ला केला तर युद्ध पुन्हा पेटू शकते. अमेरिकेने कोणतेही पाऊल आमच्याविरोधात उचलले तर आम्ही देखील त्यांना तसेच उत्तर देऊ. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगर गालिबाफ यांनी म्हटले की, चुकीच्या निर्णयाचे परिणाम कायमच चुकीचे असतात.

अमेरिकेने हल्ला केला की, आम्ही त्यांना तसेच उत्तर देऊ. जगाला इराण आणि अमेरिका युद्ध थांबले पाहिजे, असे वाटत आहे. मात्र, यादरम्यान युद्ध कमी व्हायचे तर अधिक चिघळताना दिसत आहे. अगोदरच या युद्धामुळे जग जैरीस आले. चर्चेतून मार्ग निघावा आणि होर्मुज खाडी सुरक्षित व्हावी, ही सर्वांची इच्छा आहे. मात्र, दोन्ही देश माघार घेत नाहीत. यादरम्यानच अमेरिकेकडून धक्कादायक पाऊले उचलली जात आहेत.

Follow Us
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं