AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची भीती तेच पाऊल डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलले, काही वेळातच हाहाकाराला होऊ शकते सुरूवात, थेट..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनहून अमेरिकेत परतले आहेत. यादरम्यानच धक्कादायक माहिती पुढे येत आहे. इराणविरोधात मोठी कारवाई करण्याचे नियोजन आहे. कोणत्याही क्षणी हाहाकाराला सुरूवात होऊ शकते.

जगाला ज्याची भीती तेच पाऊल डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलले, काही वेळातच हाहाकाराला होऊ शकते सुरूवात, थेट..
Donald Trump
| Updated on: May 16, 2026 | 12:23 PM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तीन दिवसांच्या चीन दाैऱ्यानंतर अमेरिकेत परतले आहेत. अमेरिकेत जाताच त्यांनी धक्कादायक निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. इराणबद्दल हा निर्णय घेतल्याचे कळतंय. होर्मुज खाडीत अजूनही तणाव आहे, मार्ग निघत नाही. त्यामध्येच भारतीय जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला. जगाला ज्या गोष्टीची प्रचंड भीती आहे, तोच निर्णय घेण्याच्या तयारीत अमेरिका आहे. इराणमध्ये पुन्हा सैन्य कारवाई करण्याचा तयारीत अमेरिका आहे. द न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या वरिष्ठ सल्लागारांसोबत मिळून सैन्य कारवाईबद्दल नवीन योजना आखत आहेत. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला की, या नव्या सैन्य कारवाईत डोनाल्ड ट्रम्प यशस्वी होतील, असे त्यांना वाटत आहे. लवकरच अमेरिका इराणविरोधात लष्करी कारवाई करणार आहे.

पेंटागनच्या अधिकाऱ्यांनी यादरम्यान बोलताना म्हटले की, ऑपरेशन एपिक फ्यूरी पुन्हा एकदा सुरू करण्याच्या तयारीत ते आहेत. गेल्या महिन्यात युद्धसंधीची घोषणा करत सैन्य कारवाई अमेरिकेने थांबवली होती. आता पुन्हा एकदा सैन्य कारवाई सुरू करण्याचा निर्णय अमेरिका घेत आहे. त्यामध्ये मोठी कारणे आहेत. अमेरिकेने इराण शेजारी केलेल्या मोठ्या नाकेबंदीनंतरही इराण हार मानत नाही.

होर्मुज खाडी बंदच आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. इराणकडून अमेरिकेला प्रस्ताव देण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव नाकारला गेला आहे. काही मुद्द्यांमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात एकमत होऊ शकत नाहीये. पाकिस्तानमध्ये इराणी लढाऊ विमाने लपवल्याने अमेरिकेचा पाकिस्तानवरील विश्वास उडाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन दाैऱ्यादरम्यान इराण युद्धाचा मुद्दा मांडला.

यादरम्यान चीनही काही गोष्टींमध्ये अमेरिकेला सपोर्ट करत असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता युद्ध थांबणे आवश्यक आहे. मात्र, युद्ध थांबण्याऐवजी पुन्हा एकदा भडताना दिसत आहे. अमेरिका इराणला जैरीस आणत आहे. मात्र, युद्ध कितीही दिवस चालले तरीही आम्हाला काळजी नसल्याचे सांगताना इराण दिसला. या युद्धाचा जगावर मोठा परिणाम होत आहे. मात्र, दोन्ही देश हार मानत नाहीत. आता अमेरिका धक्कादायक पाऊस उचलण्याच्या तयारीत आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?