अमेरिकेचा डॉलर नव्हे, ‘हे’ आहे जगातील सर्वात महागडे चलन
जगातील व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये होत आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की अमेरिकन चलन जगातील सर्वात महागडे चनल असेल. मात्र हे उत्तर चुकीचे आहे.

अमेरिका हा देश सुरुवातीपासून जगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. जगातील व्यापार देखील अमेरिकन डॉलरमध्ये होत आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की अमेरिकन चलन जगातील सर्वात महागडे चनल असेल. मात्र हे उत्तर चुकीचे आहे. जगात काही अशी चलने आहेत, ज्यांच्यासमोर डॉलर देखील कमकुवत आहे. म्हणजेच ही चलने डॉलरपेक्षा महाग आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जगात काही चलने अशी आहेत, ज्यांसाठी तुम्हाला 3 डॉलर्स खर्च करावे लागू शकतात. तसेच काही चलने यापेक्षा कमी किमतीची देखील आहे, डॉलरच्या तुलनेत ज्या देशाची चलने महाग आहेत, त्याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कुवैती दिनार
KWD हे कुवेतचे चलन आहे. कुवेतमध्ये प्रचंड तेल साठे आहेत. त्यामुळे हे जगातील सर्वात मजबूत चलन आहे. दरडोई GDP च्या बाबतीत कुवेत हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. एक कुवेती दिनारसाठी 3.27 अमेरिकन डॉलर्स खर्च करावे लागतात.
बहरीनी दिनार
BHD हे बहरीनचे चलन आहे. कुवेतप्रमाणेच या देशातही मोठे तेलसाठे आहेत. या देशाचा महागाई दर कमी आहे आणि अर्थव्यवस्था मजबूत आहे. या देशात राजकीय स्थिरता आहे, त्यामुळे हे एक अतिशय मजबूत चलन आहे. एका बहरीनी दिनारचे मूल्य 2.65 अमेरिकन डॉलर्स इतके आहे.
ओमानी रियाल
ओमान हा देश संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि येमेनच्या दरम्यान वसलेला आहे. हा देश गॅस आणि तेलाचा प्रमुख निर्यातदार आहे. तेलाला जगभरात मोठी मागणी आहे, त्यामुळे असल्याने या चलनाचे मूल्य वाढलेले आहे. एका ओमानी रियालसाठी 2.60 अमेरिकन डॉलर्स मोजावे लागतात.
जॉर्डनियन दिनार
JOD हे जॉर्डनचे चलन आहे. जॉर्डनमध्ये थेट गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झालेली आहे, त्यामुळे हे चलन मजबूत बनलेले आहे. या देशाची राजकीय व्यवस्था अस्थिर आहे, मात्र अर्थव्यवस्था स्थिर आहे. एक जॉर्डनियन दिनारसाठी तुम्हाला 1.41 अमेरिकन डॉलर मोजावे लागतात.
ब्रिटिश पाउंड
ब्रिटिश पाउंड हे जगातील सर्वात जुने चलन आहे, तसेच या चलनाचा वापरही मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला आहे. 2023 पासून व्याजदर स्थिर आहेत, त्यामुळे चलनाची किंमत कायम आहे. एका पौंडसाठी तुम्हाला 1.35 अमेरिकन डॉलर खर्च करावे लागतील.
