
Gold Reserves : या पृथ्वीच्या पोटात अशा काही गोष्टी आहेत, ज्याचा शोध अजूनही लागलेला नाही. काही गोष्टी तर अशा आहेत की त्याबाबत वैज्ञानिकांना अद्याप काहीही मजलेले नाही. मानवाला पुढच्या कित्येक पिढ्या पुरून उरेल एवढी खणीजसंपत्ती भूगर्भात आहे. सोने, चांदी यासारखे मौल्यवान धातू तर भूगर्भात जगभरात सापडतात. सध्या असाच एक चमत्कार समोर आला आहे. वैज्ञानिकांना तब्ल 1 हजार टन सोन्याचा साठा सापडला आहे. विशेष म्हणजे पुराणकथांमध्ये ज्या ठिकाणाला पवित्र, दिव्य असल्याचे म्हटले जात होते, त्याच ठिकाणी सोन्याचे विपूल भांडार सापडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वैज्ञानिकांना चीन देशामध्ये 1000 टन सोन्याचे भांडार सापडले आहे. वैज्ञानिकांना लागलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शोध असल्याचे बोलले जात असल्याचे बोलले जात आहे. वैज्ञानिकांना मिळालेले हे सोन्याचे भांडार चीनमधील शिनजियांग उइगर या भागात चीनच्या पश्चिम सीमेत कुनकुल पर्वतांमध्ये सापडले आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार वैज्ञानिकांना आढलेले हे सोने 1000 टन असून त्याची किंमत अब्जो रुपये आहे. चीनच्या भूवैज्ञानिक दलाचे वरिष्ठ अभियंता हे फुबाओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा शोध लावला आहे. सायन्स मॅगझिन अॅक्टा जिओसाइंटिका सिनिका या शोधपत्रिकेत हा शोध प्रकाशित जाला आहे. या सोन्याचा शोध लावण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न केला जात होता. चीनमधील हे तिसरे सर्वात मोठे सोन्याचे भांडार आहे. याआधी लियाओनिंग प्रांत तसेच मध्य चीनमध्ये स्थित असलेल्या हुनान प्रांतातही सोन्याचे मोठे भांडार सापडले होते.
वैज्ञानिकांना ज्या ठिकाणी 1 हजार टन सोन्याचा साठा सापडलेला आहे. त्याच ठिकाणाचा चीनच्या पुराणात एक पवित्र स्थळ म्हणून उल्लेख केलेल आहे. पुराणात कुनलुन या पर्वताचा उल्लेख आहे. हा पर्वत भव्य, दिव्य आणि पवित्र असल्याचे पुराणात सांगितलेले आहे. या पर्वताची तुलना ग्रीक पौराणिक कथात वर्णन केलेल्या माऊट ओलिंपससोबत केली जाते. प्राचीन ग्रंथ द क्लासिक ऑफ माऊंटेंस अँड सीजमध्ये कुनलुन या पर्वताला धरतीचे केंद्र असल्याचे सांगण्यात आले आहे. पृथ्वीवरील सर्व खणिजांचे भांडार याच ठिकाणी असल्याचेही पुराणात नमुद करण्यात आलेले आहे.