AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका आणि चीनच्या या धक्कादायक पाऊलामुळे जगाचा होणार नाश?, आयएमएफने दिला थेट इशारा, भारतावर…

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या धमक्या देत संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. भारत, ब्राझील आणि चीनवर अत्यंत मोठा टॅरिफ लावला. यासोबतच इतरही काही देशांना सातत्याने टॅरिफच्या धमक्या या दिल्या जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धोरणामुळे मोठा परिणाम थेट जागतिक व्यापारावर पडल्याचे स्पष्ट होताना दिसतंय.

अमेरिका आणि चीनच्या या धक्कादायक पाऊलामुळे जगाचा होणार नाश?, आयएमएफने दिला थेट इशारा, भारतावर...
trade war China and US
| Updated on: Oct 19, 2025 | 9:33 AM
Share

अमेरिका आणि चीनमध्ये सतत व्यापार तणाव वाढताना दिसतोय. त्यामध्येच अमेरिकेने चीनवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावला. दुर्मिळ खनिजांवर चीनने आकारलेल्या निर्बंधांनंतर अमेरिकेने हा टॅरिप लावला. चीन आणि अमेरिकेमधील व्यापार युद्धाचा थेट परिणाम हा जागतिक अर्थव्यवस्थेवर होताना दिसतोय. या दोन्ही देशांमधील व्यापार तणाव इतका जास्त वाढला की, याची झळ जगातील इतर देशांनी देखील बसत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) अडचणीत आहे. आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी तणाव त्वरित कमी करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर दोन्ही देश तणाव कमी करतील, असा विश्वास त्यांना आहे.

जागतिक विकासावर थेट महत्त्वपूर्ण परिणाम

दुर्मिळ पृथ्वी घटकांच्या जागतिक प्रवाहात व्यत्यय टाळतील, असे त्यांनी म्हटले. या गोष्टींमुळे जागतिक विकासावर महत्त्वपूर्ण परिणाम होईल. आयएमएफच्या गव्हर्निंग कमिटीच्या बैठकीनंतर त्यांनी हे विधान केले. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था एकमेंकांसमोर आल्याने व्यापार युद्धाला नवीन वळण मिळाले. आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या बैठकीमध्ये याबद्दल चर्चा झाली आहे.

जागतिक जीडीपी वाढ 3.2 टक्के 

जर अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद वाढतच राहिला तर याच्या फटक्यापासून भारत देखील वाचू शकणार नाहीये. भारतावर अनेकप्रकारे याचा थेट परिणाम होईल. मंगळवारी आयएमएफने 2025 साठी जागतिक जीडीपी वाढ 3.2 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. जुलैमध्ये 3.0 टक्के आणि एप्रिलमध्ये 2.8 टक्के होता. आयएमएफने म्हटले आहे की, टॅरिफ आणि आर्थिक परिस्थिती अपेक्षेपेक्षा अधिक अनुकूल असल्याचे पुढे येतंय.

आयएमएफचे प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष

जॉर्जिएवा यांनी म्हटले की, आयएमएफचे प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी जागतिक अर्थव्यवस्था धोकादायक पद्धतीने अधिक खाली जाताना दिसत आहे. या जगासाठी नक्कीच मोठा धोका म्हणावा लागेल. जर हीच परिस्थिती पुढील काही दिवस राहिली तर याचा थेट परिणाम जगातील प्रत्येक देशांवर होईल. जागतिक अर्थव्यवस्था वाईट स्थितीत असल्याने पुढील काही दिवसांमध्ये धोका वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफनंतर 70 टक्के निर्यात बंद झालीये.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.