AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रात 8.7 रिश्टर स्केलचा भूकंप, थेट त्सुनामीचा इशारा, अलर्ट जारी, पुढील चार तास…

अगोदर समुद्रात भूकंप आणि त्यानंतर थेट त्सुनामीचा इशारा हा देण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. या भूकंपानंतर अमेरिका आणि जपानमध्ये थेट त्सुनामीचा इशारा देण्यात आला. या भूकंपामध्ये मोठे नुकसान झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात आलीये.

समुद्रात 8.7 रिश्टर स्केलचा भूकंप, थेट त्सुनामीचा इशारा, अलर्ट जारी, पुढील चार तास...
Tsunami
| Updated on: Jul 30, 2025 | 8:40 AM
Share

अगोदर भयानक भूकंपाचे धक्के आणि त्यानंतर थेट त्सुनामीचा इशारा देण्यात आला. यामुळे लोकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण हे बघायला मिळतंय. धक्कादायक म्हणजे या भूकंपाच्या धक्क्यावेळीची काही फोटो आणि व्हिडीओही पुढे आली आहेत. बुधवारी (30 जुलै) रशियातील कॅमचटका येथे भयानक भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.7 इतकी होती. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, हा भूकंप समुद्राखाली झाला. त्यानंतर आता त्सुनामीचा मोठा धोका आहे.

अमेरिका आणि जपानमध्ये त्सुनामीचा मोठा धोका 

या भूकंपानंतर अमेरिका आणि जपानमध्ये थेट त्सुनामीचा इशारा देण्यात आला. या भूकंपामध्ये मोठे नुकसान झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात आलीये. मात्र, अजून स्पष्ट होऊ शकले नाही की, या भूकंपात नेमके किती नुकसान झाले. थरकाप उडवणारी या भूकंपाची व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. भूकंपाचे केंद्र समुद्रात असल्याने धोका हा अधिकच वाढल्याचे दिसत आहे.

प्रशासनाकडून लगेचच बोलावण्यात आली महत्वाची बैठक 

वृत्तानुसार, या भूकंपानंतर जपानच्या हवामान संस्थेने म्हटले आहे की, 1 मीटर उंचीच्या लाटा जपानच्या किनारपट्टीच्या भागात येऊ शकतात. जपानचे पंतप्रधान यांना या भूकंपाची संपूर्ण माहिती देण्यात आली असून प्रत्येक गोष्टीवर ते स्वत: नजर ठेऊन आहेत. हेच नाही तर सरकारकडून लगेचच आपत्कालीन बैठकही बोलावली. ज्यामध्ये मदत आणि बचाव कार्यांवर चर्चा करण्यात आली.

भूकंपाचे केंद्रस्थान समुद्रात धोका अधिक तीव्र 

कोणत्याही परिस्थितीमध्ये परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू केलीये. रशियामध्ये पहिल्यांदा भूकंप आला, असे अजिबातच नाहीये. यापूर्वीही अनेकदा भूकंप येऊन गेलाय. या वर्षी 20 जुलै रोजी कॅमचटकामध्येही तीव्र भूकंप झाला होता, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 होती. अमेरिकेकडूनही त्सुनामीचा इशारा अनेक भागात देण्यात आला आहे. पुढील तीन तासांत रशिया आणि जपानच्या काही भागात धोकादायक त्सुनामी लाटा धडकू शकतात, असे म्हटले आहे. पुढील काही तास अत्यंत महत्वाचे असल्याचे बोलले जातंय लोकांनाही सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आहे. 

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती