AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानला अत्यंत मोठा धक्का, मित्र देशानेच केली मोठी पोलखोल, थेट पाकची…

तुर्की कायमच पाकिस्तानसोबत उभा राहिला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुर्कीने पाकिस्तानची मदत केली. मात्र, आता तुर्कीने अत्यंत मोठा थेट झटका पाकला दिला. ज्याने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे.

पाकिस्तानला अत्यंत मोठा धक्का, मित्र देशानेच केली मोठी पोलखोल, थेट पाकची...
Pakistan and Turkey
| Updated on: Feb 02, 2026 | 12:47 PM
Share

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एका मागून एक धक्के बसताना दिसत आहेत. तुर्की पूर्वीपासूनच पाकिस्तानचा चांगला मित्र राहिला. मात्र, आता तुर्कीनेही अत्यंत मोठा झटका पाकला दिला. यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत चांगलीच मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. अंकाराने स्पष्ट केले आहे की सौदी अरेबिया आणि पाकिस्तानसोबत कोणत्याही बहुपक्षीय संरक्षण करारात सामील होणार नाहीत. भारताने ज्याप्रकारे पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले, त्यानंतर पाकिस्तानने साैदी अरेबियासोबत मोठा संरक्षण करार केला. पाकिस्तानवर हल्ला म्हणजे साैदी अरेबियावर समजला जाणार असल्याचा तो करार आहे. आता यादरम्यानच तुर्कीने हातवर गेले. पाकिस्तानला तुर्कीकडून मोठ्या अपेक्षा असताना तुर्कीने हा मोठा झटका दिला.

एएफपीच्या अहवालानुसार, तुर्कीच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, एर्दोगान सरकार पाकिस्तान आणि सौदी अरेबियासोबतच्या कोणत्याही संरक्षण कराराचा भाग नाही. हेच नाही तर त्यांनी म्हटले की, आम्हाला असा संरक्षण करारात कोणत्याही रस नाहीये. त्यांनी पुढे म्हटले, सौदी अरेबिया कोणत्याही बहुपक्षीय व्यवस्थेच्या बाजूने नक्कीच नाही, ते फक्त द्विपक्षीय संरक्षण करारांना प्राधान्य देतात, ही वस्तू स्थिती आहे.

हेच नाही तर तुर्कीने पाकिस्तानबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारत, अफगाणिस्तान आणि इराणसारख्या देशांसोबत अगोदरच पाकिस्तानचे संबंध तणावात आहेत. पाकिस्तानच्या सीमेवर तणाव बघायला मिळतोय. पाकिस्तान सैन्य दबावात असल्याचेही सांगितले जाते. तुर्कीने यादरम्यान पाकिस्तानमधील आर्थिक स्थितीकडेही बोट दाखवले मजबूत अर्थव्यवस्था मजबूत लष्करासाठी उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी म्हटले.

तुर्की आणि पाकिस्तानने त्यांचे संवर्धन संबंध मजबूत असल्याचे अधोरेखित केले आहे. तुर्कीने पाकिस्तानच्या सर्वच गोष्टींवर थेट भाष्य केल्याने मोठी खळबळ उडाली. हेच नाही तर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही वर्षांपासून तुर्की सातत्याने पाकिस्तानला मदत करताना दिसत आहे. मात्र, तुर्की सध्याच्या परिस्थितीमध्ये पाकला भविष्यात किती मदत करेल, हे सांगणे कठीण आहे. तुर्कीने पहिल्यांदाच अशाप्रकारचा झटका पाकला दिला आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी