मोठी बातमी! बॉर्डरवर सापडले दोन मृतदेह, पाकिस्तानचा मोठा डाव? नेमकं प्रकरण काय?

राजस्थानमधील जैसलमेरमधील सादेवाला भागात भारत-पाकिस्तान सीमेजवळ एका मुलाचे आणि मुलीचे मृतदेह आढळले आहेत. हे मृतदेह सुमारे ६-७ दिवस जुने असल्याचे सांगितले जात आहे. मृतदेहांजवळ पाकिस्तानी सिम कार्ड आणि ओळखपत्रे दे

मोठी बातमी! बॉर्डरवर सापडले दोन मृतदेह, पाकिस्तानचा मोठा डाव? नेमकं प्रकरण काय?
Pakistan
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 29, 2025 | 12:59 PM

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळ एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा आणि एका युवकाचा मृतदेह सापडला आहे. हे मृतदेह सुमारे 6-7 दिवस जुने असल्याचे सांगितले जात आहे. मृतदेहांजवळ पाकिस्तानी सिम कार्ड आणि आयडी कार्ड देखील सापडले आहेत. त्यामुळे असा संशय व्यक्त केला जात आहे की, ज्या मुलीचा आणि मुलाचा मृतदेह सापडला आहे, ते पाकिस्तानी असू शकतात. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

पोलिस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सीमेच्या तारबंदीपासून सुमारे 10 ते 12 किलोमीटर आत भारतीय हद्दीतील सादेवाला परिसरात हे दोन मृतदेह सापडले आहेत. तनोट पोलिसांनी दोन्ही मृतदेह रामगड सीएचसीच्या शवागारात ठेवले आहेत. शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा खुलासा होऊ शकेल. ही मुलगी आणि मुलगा भारतात राहत होते की पाकिस्तानात, याचीही चौकशी सुरू आहे.

वाचा: लोलाने 7 वेळा केली प्रायवेट पार्टची सर्जरी, बनली भारतीय; मग जो धंदा सुरु केला त्याने…

पाकिस्तानी आयडी आणि सिम कार्ड जप्त

मृतदेहाजवळ सापडलेल्या आयडी कार्डनुसार, युवकाचे नाव रवि कुमार, वडील दीवाना, पोस्ट ऑफिस गुलाम हुसैन लिगारी, घोटकी, सिंध, पाकिस्तान असे सांगितले जात आहे. तर मुलगी अल्पवयीन असून तिचे नाव शांती बाई, वडील गुलोजी असे आहे. दोघेही एकाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांचे रहिवासी आहेत. माहितीनुसार, पाकिस्तानी सिम आणि आयडी कार्डसह सापडलेल्या मृतदेहांबाबत सुरक्षा यंत्रणा, सीमा सुरक्षा दल आणि जैसलमेर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या सगळ्यात पाकिस्तानचा नवा डाव तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे.

सर्व पैलूंवर तपासात व्यस्त यंत्रणा

आसपासच्या गावांमध्येही चौकशी केली जात आहे. कदाचित हे दोघे पाकिस्तानातून व्हिसावर जैसलमेरमध्ये राहत असावेत. तसेच, तारबंदी ओलांडून भारतात येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. यंत्रणा सर्व पैलूंवर तपास करत असून, हे दोघे पाकिस्तानात राहत होते की भारतात, त्यांचा मृत्यू कसा झाला आणि त्यांचे मृतदेह इथे कसे पोहोचले, यासर्व बाबींचा तपास सर्व दृष्टिकोनातून केला जात आहे.