AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या शेजारी देशात लवकरच भयानक विध्वंस? विशाल समुद्रातून येतंय मोठं संकट!

हेनान प्रांतात या वर्षाचे सर्वांत मोठे वादळ आले आहे. या वादळाची तीव्रता वाढत असून ते धोकादायक बनले आहे.

भारताच्या शेजारी देशात लवकरच भयानक विध्वंस? विशाल समुद्रातून येतंय मोठं संकट!
thunderstorm (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)
| Updated on: Jun 14, 2025 | 4:28 PM
Share

China Storm : भारताचा शेजारी देश चीनला मोठ्या समुद्री वादळानं घेरलं आहे. येथील हेनान प्रांतात व्युटिप वादळ आदळण्याचा धोका वाढला आहे. याच कारणामुळे या भागातील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. चीनमधले या वर्षातील हे पहिले वादळ आहे.

व्युटिप वादळाने धारण केलं भीषण रुप

मिळालेल्या माहितीनुसार या वादळाने आता शनिवारी स्थानिक वेळेनुसार 12.30 वाजता दक्षिण चीनच्या ग्वागडोंग प्रांतातील लिजौ या शहराजवळ धडक दिली आहे. व्युटिप या वादळाने आता आणखी भीषण रुप धारण केलं आहे. या वादळाच्या केंद्रस्थानाची गती 30 मिटर प्रतिसेकंद होती. हे वादळ शुक्रवारी रात्री 11 वाजता दक्षिण चीनमधील हेनान या प्रांतातील डोंगफँग शहराजवळ पोहोचले होते.

हेनान प्रांतातील पहिलेच वादळ

या वादळाबाबत सिन्हुआ या वृत्तसंस्थेने सविस्तर वृत्त दिले आहे. व्युटिप वादळ 20 ते 25 किमी प्रतितास या वेगाने उत्तरत-पूर्वेकडे सरकत आहे. हे वादळ ग्वांगडोंग आणि गुआंग्शी या भागाला धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू या वादळाची तीव्रता कमी होणार आहे. दक्षिण चीनच्य हेनान प्रांतातील या वर्षाचे हे पहिलेच वादळ आहे. या वादळाच्या भक्ष्यस्थानी सापडण्याची भीती लक्षात घेता येथे हजारो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

व्युटिप वादळ धोकादायक का आहे?

व्युटिप हे वादळ या वर्षी दक्षिण चीनच्या समुद्रात निर्माण झालेले पहिलेच ट्रॉपिकल वादळ आहे. चीनमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या काळात अशा वादळांचा धोका असतो. या वादळाने मात्र कमी काळात भीषण रुप धारण केलेले आहे. त्यामुळेच या वादळाचा मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे.

चीनचं झालं होतं मोठं नुकसान

दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात टायकून गेमी या वादळामुळे चीनचे मोठे नुकसान झाले होते. या वादळात एकूण 30 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर या वादळामुळे अनेक लोक बेपत्ता झाले होते. तर सध्याच्या ताज्या वादळाला तोंड देण्यासाठी चीनने मोठी तयारी केली आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम केले जात आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.