
UAE Visa Ban For Pakistan : पाकिस्तान हा असा देश आहे, जिथे गरिबी, महागाई या प्रमुख समस्य आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी पाकिस्तानातील हजारो नागरिक परदेशात जातात. यातील काही नागरिक हे बेकायदेशीरपणे इतर देशांत घुसखोरी करतात. तर काही नागरिक हे अन्य देशांत जाऊन चांगलाच उच्छाद मांडताना दिसतात. असे असले तरी पाकिस्तानातील नागरिक परदेशात जाण्याचे प्रमाण बरेच आहे. पाकिस्तानी नागरिक विशेषत: मुस्लीम देशात जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. असे असतानाच आता एका मुस्लीम देशाने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. या देशाने पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात येण्यास थेट मनाई केली आहे. पाकिस्तानी नागरिकांना या देशाने व्हिसा देणे थेट थांबवले आहे. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएई पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात येण्यास मज्जाव केला आहे. यूएईमध्ये गेल्या काही वर्षांपासून गुन्हागारी प्रकरणं वाढले आहेत. त्यामुलेच हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाचनेच याबाबत माहिती दिली आहे. या माहितीनुसार यूएईने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यास मनाई केली आहे. सौदी अरेबियादेखील पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घालणार होता. परंतु शाहबाज शरीफ यांच्या सरकारने विनवणी केल्यानंतर सौदी अरेबीयाने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा न देण्याचा निर्णय तुर्तास घेतलेला नाही.
पाकिस्तानमधील डॉन या प्रसिद्ध वर्तमानपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशात व्यापारविषय, राजनयिक संबंध आहेत. आतापर्यंत या दोन्ही देशांमध्ये व्यापारवाढीचे अनेक करार झालेले आहेत. असे असताना यूएईने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे थांबवले आहे. ग्लोबल मीडिया इनसाईटनुसार यूएईमधील पाकिस्तानी नागरिकांची संख्या साधारण 19 लाखांच्या आसपास आहे. पाकिस्तानी नागरिक यूएईमध्ये दुबई, अबूधाबी या शहरांत जाऊन काम करतात. 2024 साली एकूण 64 हजार पाकिस्तानी नागरिक वर्क व्हिसावर यूएईमध्ये गेले होते.
परंतु गेल्या काही दिवसांत यूएईमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पाकिस्तानी नागरिक अनेक प्रकरणात आरोपी म्हणून समोर आलेले आहेत. पाकिस्तानी नागरिक यूएईमध्ये महिलाचे विनापरवानगी फोटो काढतात, असाही आरोप आहे. ही सर्व कारणे लक्षात घेता यूएईने सध्या पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.