AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहा किलोमीटर टॅक्सी प्रवासाचे भाडे तब्बल 32 लाख रुपये, बिल पाहून स्वतः ड्रॉयव्हरने मारला डोक्यावर हात!

एका व्यक्तीला सहा किलोमीटर टॅक्सी प्रवासाचे भाडे थोडे थोडके नाही तर चक्क 32 लाख रुपये आले. असा घडला प्रकार

सहा किलोमीटर टॅक्सी प्रवासाचे भाडे तब्बल 32 लाख रुपये, बिल पाहून स्वतः ड्रॉयव्हरने मारला डोक्यावर हात!
टॅक्सी Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 08, 2022 | 6:30 PM
Share

ब्रिटन, काळ बदलला आहे, आता लोक कुठेही जाण्यासाठी बस, रिक्षा किंवा इतर कोणत्याही वाहनाची वाट पाहत नाहीत. थेट उबेर किंवा ओला बुक करतात आणि सुखद प्रवास करतात. असाच सुखद प्रवास करण्यासाठी एका व्यक्तीने ऑनलाईन टॅक्सी (Online Taxi) बुक केली. अवघ्या सहा किलोमीटरचा (6 KM Bill) प्रवास झाल्यानंतर त्याने ड्रायव्हरला बिल विचारले तर ड्रायव्हर आणि त्या व्यक्तीने कपाळावर हातच मारला! त्याचे कारण म्हणजे बिलाची रक्कम थोडी थोडकी नाही तर तब्बल 32 लाख रुपये होती. विश्वास बसत नसला तरी ही घटना खरी आहे.

कुठे घडली ही घटना?

हे आश्चर्यकारक प्रकरण ब्रिटनमधून समोर आले आहे. एका  22 वर्षीय ऑलिव्हर कॅप्लानने ऑफिस ते पबपर्यंत उबेर कॅब बुक केली. हे पैसे त्याच्या अकाऊंटमधून थेट कापल्या जाणार होते. त्याने सहज कॅब ड्रायव्हरला बिलाची रक्कम विचारली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण टॅक्सीचे बिल थोडेथोडके नव्हे तर तब्बल भारतीय मुद्रेत 32 लाख इतके आले.

कशी झाली ही घोडचूक?

एवढे जास्त बिल पाहून ऑलिव्हरने लगेच कस्टमर केअरला फोन करून या प्रकरणाचा खुलासा करण्यास सांगितले, एवढं जास्त बिल पाहून कस्टमर केअर कर्मचारीही आश्चर्यचकित झाले पण जेव्हा त्यांना त्यामागचे खरे कारण कळले हे कळल्यावर त्यांनी ही समस्या सोडवली.

घडले असे की ऑलिव्हर मँचेस्टर  येथे जाणार होता परंतु त्याने चुकून ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथे त्याचे ड्रॉप लोकेशन टाकले. ज्याचे अंतर सुमारे 16000 किमी आहे आणि म्हणूनच उबरने त्याच्यावर  32 लाखांचे फाडले.

खात्यात 32 लाख असते तर…

ऑलिव्हरने प्रश्न केला आहे, की  हे कसे शक्य आहे? कुठली टॅक्सी मला जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या  सोडणार होती?  मी खरोखर भाग्यवान आहे की माझ्या खात्यात इतके पैसे नव्हते नाहीतर मला स्वतःच्या पैशासाठी त्यांच्या मागे धावावे लागले असते. मात्र, याबाबत कंपनीचे म्हणणे आहे की, ऑलिव्हरने तक्रार दाखल करताच आम्ही तातडीने या प्रकरणाची चौकशी करून समस्या सोडवली.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...