AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाला थांबायला सांगा.. थेट भारताकडे विनंती, आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी, भारताने..

Russia Ukraine War : इराण आणि अमेरिका युद्धाने जग तणावात असतानाच आता रशिया आणि युक्रेन युद्धात मोठी घडामोड पुढे येत आहे. युक्रेनकडून जगातील महत्वाच्या नेत्यांकडे गळ घालण्यात आली. आता या युद्धाबाबत त्यांनी मोठी विनंती केली.

रशियाला थांबायला सांगा.. थेट भारताकडे विनंती, आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी, भारताने..
vladimir putin and pm narendra modi
| Updated on: Apr 24, 2026 | 11:35 AM
Share

जग एका वेगळ्या संकटात आहे. दोन मोठी युद्ध सुरू आहेत, ज्याचा फटका जगाला बसत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच जागतिक नेत्यांना रशियाविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले. हेच नाही तर या नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्ध थांबवण्यास सांगावे, असेही त्यांनी म्हटले. युक्रेन आणि रशियातील युद्ध गेल्या 4 वर्षांपासून सुरू आहे. युक्रेनचा रशिया एका झटक्यात पराभव करेल, असा अंदाज जगाचा होता. मात्र, प्रत्यक्षात सर्वकाही उलटे घडले. अमेरिकेसह नाटो देश युक्रेनची मदत करत आहेत. त्यामुळे हे युद्ध अधिक काळ चालू आहे. भारत हा रशियाचा जुना मित्र आहे. मात्र, या युद्धात भारताची भूमिका शांततेची आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला होता. यासोबतच युक्रेनकडूनही काही आरोप करण्यात आली. आता तोच युक्रेन भारताला मदत मागत आहे.

एक्सवर पोस्ट शेअर करत वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले की, हा संघर्ष थांबवण्यासाठी फक्त मध्यस्थी पुरेशी ठरणार नाहीये. मला वाटते की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष शी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यासोबतच जगातील प्रमुख व्यक्तींनी पुतिन यांना सांगितले पाहिजे की, युद्ध थांबवलेच पाहिजे. मुळात म्हणजे युक्रेन असे म्हणू शकत नाही की, युद्ध थांबले पाहिजे.

आम्ही आमचे संरक्षण करत आहोत. आम्ही कुठेही आक्रमक नाहीत.  त्यांनी पुढे म्हटले की, जर तुम्ही मध्यस्थी करत असाल तर पुतिन यांना कोणत्याही पश्चात्ताप नाही.. जर खरोखरच त्यांना थांबवायचे असेल तर मला विश्वास आहे की, जगातील शक्तीशाली देश यात नक्कीच मध्यस्थी करू शकतात… युद्ध थांबवण्यासाठी चर्चा नाही तर आंतरराष्ट्रीय दबाव महत्नाचा आहे.

तुमच्या सर्वांना पुतिन यांना थांबवावे लागेल. एक महान नेता असण्याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ मुत्सद्देगिरीद्वारे युद्ध थांबवणे असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. गेल्या काही दिवसांपासून हे युद्ध थांबवण्याकरिता अमेरिका मध्यस्थी करत आहे. मात्र, त्यांना अजिबातच यश मिळत नाही. त्यामध्ये अमेरिकाच इराणसोबत युद्धाच्या मैदानात आहे. आता युक्रेनने थेट जगातील शक्तीशाली देशांच्या प्रमुखांकडे गळ घातली आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल