अनोखी परंपरा! ‘या’ देशात हजारो मुली राजासमोर विवस्त्र होऊन नाचतात, त्यानंतर राजा…

भारतासह जगभरातील देशांमध्ये अनोख्या परंपरा पाळल्या जातात. एका आफ्रिकन देशातील परंपरा अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनोखी परंपरा! या देशात हजारो मुली राजासमोर विवस्त्र होऊन नाचतात, त्यानंतर राजा...
Eswatini King
| Updated on: Jul 08, 2025 | 9:11 PM

भारतासह जगभरातील देशांमध्ये अनोख्या परंपरा पाळल्या जातात. काही देशांमधील परंपरा इतक्या विचित्र आहेत की त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पूर्वी स्वाझीलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्वातिनी या देशातील परंपरा अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. या आफ्रिकन देशात लोकशाही नसून आजही राजेशाही आहे. त्यामुळे संपूर्ण देशावर राजाचे वर्चस्व आहे. राजेशाही असल्याने या देशात आजही जुन्या परंपरांचे पालन केले जाते.

मुली राजासमोर विवस्त्र होऊन नाचतात

इस्वातिनीमध्ये दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये उम्हलांगा सेरेमनी पार पडते. हा कार्यक्रम राजधानीजवळील लुडझिडजिनी गावात आयोजित केला जातो. या कार्यक्रमात देशभरातील 10 हजारांहून अधिक अविवाहित मुली सहभागी होतात आणि त्या राजा आणि त्याच्या प्रजेसमोर विवस्त्र होऊन नाचतात. यानंतर राजा यातून त्याला आवडलेली राणी निवडतो. ही परंपरा विचित्र असली तरी येथील लोक ती संस्कृतीचा भाग मानतात.

परंपरेला अनेकदा विरोध

या विचित्र परंपरेला गेल्या काही वर्षांपासून विरोध होत आहे. बऱ्याच मुलींनी या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिल्याचे समोर आले होते, मात्र यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही संघटनांनी याला महिलांच्या हक्कांविरुद्ध असलेली परंपरा म्हटले होते, तेव्हापासून या परंपरेला विरोध होत आहे.

राजाचा भारताशी संबंध

इस्वातिनीचा राजा मस्वती तिसरा हा त्याच्या आलिशान जीवनाशैलीमुळे चर्चेत असतो. त्याला 15 पेक्षा जास्त बायका आहेत. देशात गरीबी आणि बेरोजगारी आहे, तरीहीराजा आलिशान राजवाड्यांमध्ये राहतो, मस्वती तिसरा 2015 मध्ये भारतात आला होता त्यावेळी त्याच्यासोबत 15 बायका, मुले आणि 100 नोकर होते. यासाठी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 200 रुम बुक करण्यात आल्या होत्या, त्यामुळे तो प्रकाशझोतात आला होता.