AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-US War Update : भारतासह जगाला संकटात ढकलून अमेरिकेने युद्धातून कमावले 16 अब्ज डॉलर्स, जे मार खातायत त्यांच्याकडूनच उकळणार पैसा

Iran-US War Update : अमेरिका पक्का व्यापारी देश आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वत: मोठे बिझनेसमॅन आहेत. त्याचच एक उदहारण समोर आलय. या युद्धात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसतोय. पण अमेरिका मात्र बक्कळ पैसा कमावतेय कसं ते समजून घ्या.

Iran-US War Update : भारतासह जगाला संकटात ढकलून अमेरिकेने युद्धातून कमावले 16 अब्ज डॉलर्स, जे मार खातायत त्यांच्याकडूनच उकळणार पैसा
Donald Trump
| Updated on: Mar 20, 2026 | 9:28 AM
Share

युद्ध अमेरिका-इस्रायलने सुरु केलं. काहीही संबंध नसताना आखाती देश यामध्ये ओढले गेले. इराणच्या हल्ल्यांची मार त्यांना झेलावी लागतेय. या सगळ्यात अमेरिकेने मात्र स्वत:च व्यापारी हित साधलं आहे. महत्वाचं म्हणजे जे मार खातायत त्या देशांकडून अमेरिका पैसा कमावणार आहे. इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकी प्रशासनाने संयुक्त अरब अमीरात, कुवैत आणि जॉर्डन या देशांना अब्जो डॉलर्सची घातक शस्त्रास्त्र विकण्याची परवानगी दिली आहे. इराण विरुद्ध वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. या डिफेन्स डीलमुळे आखाती देशांची एअर डिफेन्स सिस्टिम अजून मजबूत होईल आणि हल्ला करण्याची क्षमता वाढेल.

इराण युद्धाचा सर्वाधिक फटका झेलणाऱ्या आखाती देशांमधील संयु्क्त अरब अमिरात, कुवैत आणि जॉर्डन यांना 16.46 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्र विकण्याची अमेरिकेने परवानगी दिली आहे. मागच्या महिन्यात 28 फेब्रुवारीला अमेरिका-इस्रायलने मिळून इराण विरोधात युद्ध सुरु केलं. व्यापक हवाई हल्ले केले. प्रत्युत्तर म्हणून इराणने सुद्धा मिसाइल आणि ड्रोन्सनी मोठे हल्ले केले. यामुळे आखाती देशांमध्ये जिवीत व वित्तहानी झाली. इराणच्या हल्ल्याचा सामना करताना मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा वापर करावा लागला.

कुठला सर्वात मोठा सौदा?

तात्काळ सैन्य साधनांची गरज आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी पुरेसे पुरावे दिले आहेत. त्यामुळे अमेरिकन काँग्रेसच्या मंजुरीची आवश्यकता नाही असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. कुवेतला 8 अब्ज डॉलरचे एडवांस्ड लोअर टियर एयर एंड मिसाइल डिफेंस सेंसर रडार देण्यात येईल. हाच सर्वात मोठा सौदा आहे. हे रडार उच्च गतीने येणारं मिसाइल, ड्रोन यांना ट्रॅक करणं आणि एअर डिफेन्स सिस्टिमला डेटा देण्यासाठी बनवण्यात आले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ही माहिती दिली.

संयुक्त अरब अमिरातबरोबर किती अब्जचा करार

त्यानंतर संयुक्त अरब अमिरातला 4.5 अब्ज डॉलरचं सैन्य साहित्य विकण्यात येणार आहे. यात बॅलेस्टिक मिसाइल्सना ट्रॅक करणारं रडार आहे. त्याशिवाय 2.1 अब्ज डॉलरची छोटी, मानवरहीत विमानं नष्ट करण्यासाठी बनवण्यात आलेली सिस्टिम, 1.22 अब्ज डॉलरची एअर टू एअर मिसाइल्स आणि 644 मिलियन डॉलरमध्ये F-16 फायटर जेट्ससाठी स्फोटक साहित्यांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे.

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप