AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-US War Update : युद्धातली अमेरिकेची पहिली मोठी हार, इराणबाबत ट्रम्प स्वत: करणार एक मोठी घोषणा

Iran-US War Update : बलाढ्य अमेरिकेवर अशी वेळ यावी हे दुर्देवच म्हणावं लागेल. ज्यांच्या विरुद्ध अमेरिका युद्ध लढतेय त्यांच्याच फायद्याचा अमेरिकेला एक चांगला निर्णय घ्यावा लागणार आहे. ही अमेरिकेची पहिली मोठी हार आहे. इराणचा रणनितीक विजय आहे.

Iran-US War Update : युद्धातली अमेरिकेची पहिली मोठी हार, इराणबाबत ट्रम्प स्वत: करणार एक मोठी घोषणा
Donald Trump
| Updated on: Mar 20, 2026 | 8:45 AM
Share

इराण विरुद्ध युद्ध सुरु करताना अमेरिकेने काही आडाखे बांधले होते. पण ती उद्दिष्टय अजून पूर्ण झालेली नाही. ती लवकर पूर्ण होतील असही वाटत नाही. उलट युद्धात अमेरिकेची पिछेहाट सुरु आहे. अमेरिकेला इस्रायलच्या आक्रमकतेला आवर घालावा लागतोय. इराणची युद्धनिती सध्याच्या घडीला अमेरिकेपेक्षा सरस ठरतेय. इराणकडून अमेरिका-इस्रायलच्या आक्रमकतेला आवर घालणारे अचूक रणनितीक वार सुरु आहेत. या दरम्यान अमेरिका इराणबाबत लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे. खरंतर या निर्णयाकडे अमेरिकेची हार म्हणूनच पहावं लागेल. इराणचा एक प्रकारे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करण्याचा जो निर्णय आहे, त्याचा रणनितीक विजय आहे. बलाढ्य अमेरिकेवर अशी वेळ यावी हे दुर्देवच आहे.

ज्यांना रोखण्यासाठी अमेरिका युद्ध लढतोय. त्यांच्यावरील निर्बंध मागे घेण्याची वेळ युनायटेड स्टेट्‍स ऑफ अमेरिकेवर आलीय. मिडिल ईस्टमधील वाढत्या तणावादरम्यान जागतिक तेल पुरवठ वाढवण्यासाठी आणि किंमती कमी करण्यासाठी अमेरिकेने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अमेरिका लवकरच समुद्री मार्गांवर अडकलेल्या टँकर्समधील जवळपास 14 कोटी बॅरल इराणी तेलावरील प्रतिबंध हटवू शकते अमेरिकेचे अर्थ मंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी हे संकेत दिले आहेत. जागतिक तेल किंमती कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय अमेरिका का घेणार?

येत्या काही दिवसात आम्ही समुद्रात अडकलेल्या इराणी तेलावरील प्रतिबंध हटवू शकतो असं अमेरिकेचे अर्थ मंत्री स्कॉट बेसेन्ट गुरुवारी फॉक्स बिजनेस नेटवर्कच्या मॉर्निंग्स विद मारिया कार्यक्रमात बोलले. अडकलेल्या जहाजांवर जवळपास 140 मिलियन बॅरल तेल आहे. इतक्या तेल साठ्यामुळे 10 दिवस ते दोन आठवडे जगाला तेल पुरवठा होऊ शकतो.

तेलाच्या किंमती काय आहेत?

जागतिक तेल पुरवठा वाढवणं आणि गगनाला भिडणाऱ्या तेल किंमती कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे असं स्कॉट बेसेन्ट म्हणाले. मागच्या दोन आठवड्यात कच्चा तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरेलच्या पुढे गेल्या आहेत. कारण इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद ठेवलं आहे. इराणी तेलाच्या माध्यमातून प्रतिदिन बाजारात कमी पडणारं 10 ते 14 मिलियन तेल भरुन काढणं हा अमेरिकेचा उद्देश आहे. हे 14 कोटी बॅरल तेल आल्यास पुढचे 10 ते 14 दिवस पुरवठा सुरळीत सुरु राहिलं.

Follow Us
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल