अमेरिकेने हल्ला केलेल्या व्हेनेझुएलामध्ये किती हिंदू अन् किती मुस्लिम? सर्वात मोठा धर्म कोणता?
Venezuela : अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे व्हेनेझुएलातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज आपण व्हेनेझुएलाची संस्कृती, तेथील लोकांचा धर्म कोणता आहे? मुस्लिम आणि हिंदूंची लोकसंख्या किती आहे हे जाणून घेऊयात.

अमेरिकेने व्हेनेझुएलातील अनेक भागांवर हल्ला केला आहे, त्यामुळे हा देश संकटात सापडला आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अमेरिकन सैन्याने ताब्यात घेतले असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे संपूर्ण देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आता जगभरातील लोक व्हेनेझुएलाबाबत माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहेत. आज आपण व्हेनेझुएलाची संस्कृती, तेथील लोकांचा धर्म कोणता आहे? मुस्लिम आणि हिंदूंची लोकसंख्या किती आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
व्हेनेझुएलातील सर्वात मोठा धर्म कोणता आहे?
व्हेनेझुएलामध्ये ख्रिश्चन धर्म विशेषतः रोमन कॅथोलिक धर्माचे लोक सर्वाधिक आहेत. एकूण लोकसंख्येच्या सुमारे 65% ते 70% लोक रोमन कॅथोलिक घर्माचे पालन करतात. स्पॅनिश राजवटीच्या काळापासून या देशात कॅथोलिकची मुळे रुजलेली आहेत. या देशाच्या शिक्षण पद्धतीत आणि सामाजिक जीवनात चर्चने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये चर्चचा प्रभाव कमी झाला आहे.
प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्म
व्हेनेझुएलाच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे 10% ते 17% लोकसंख्या प्रोटेस्टंट ख्रिश्चन आहे. यातील बहुतांशी लोक इव्हँजेलिकल चर्चचे आहेत. हे लोक पूर्वी कॅथोलिक होते परंतु नंतर त्यांनी प्रोटेस्टंट धर्मात धर्मांतर केले. त्यामुळे या देशात अनेकदा सरकार आणि धार्मिक संघटनांमध्ये मतभेद झाल्याचे पहायला मिळालेले आहे.
व्हेनेझुएलामध्ये मुस्लिम लोक किती आहेत?
व्हेनेझुएलामध्ये जवळपास एक लाख मुस्लिम लोक आहेत. हे मुस्लिम लेबनीज आणि सीरियन वंशाचे आहेत. या लोकांचे पूर्वज 20 व्या शतकात व्यापार आणि रोजगारासाठी येथे आले होते. हो लोक कराकस आणि नुएवा एस्पार्टा राज्यात राहतात. त्यामुळे या परिसरात मशिदी आणि इस्लामिक केंद्रे मोठ्या प्रमाणात आहेत. या देशातील मुस्लिम लोक व्यवसाय आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असल्याचे पहायला मिळालेले आहे.
व्हेनेझुएलामध्ये किती हिंदू लोक आहेत?
व्हेनेझुएलामध्ये हिंदू लोक खूप कमी आहेत. या देशातील हिंदूंच्या लोकसंख्येबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र हा आकडा मुस्लिम, यहुदी आणि बौद्धांपेक्षा कमी मानली आहे. फार कमी प्रमाणात हिंदू लोक असल्यामुळे या देशात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे खूप कमी असल्याचे पहायला मिळते.
