AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिशन सक्सेसफुल, अमेरिकेने इराणच्या 3 लष्करी तळांवर हल्ला करताच ट्रम्प यांचे विधान, म्हणाले आमचे ध्येय…

होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर मोठा हवाई हल्ला केला आहे. अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याच्या वादातून हा तणाव वाढला असून दोन्ही देश आमनेसामने आले आहेत.

मिशन सक्सेसफुल, अमेरिकेने इराणच्या 3 लष्करी तळांवर हल्ला करताच ट्रम्प यांचे विधान, म्हणाले आमचे ध्येय...
Donald Trump
| Updated on: Jun 10, 2026 | 7:57 AM
Share

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिका आणि इराणमधील लष्करी तणाव टोकाला पोहोचला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेचे ‘अपाचे’ हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा करत अमेरिकन सैन्याने ९ जून रोजी इराणच्या हद्दीत घुसून भीषण हवाई हल्ले केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. यात इराणच्या तीन अत्यंत महत्त्वाच्या लष्करी आणि नौदल तळांचे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या लष्करी कारवाईमुळे संपूर्ण आखाती प्रदेशात युद्धाची ठिणगी पडली असून जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमेरिकेचा इराणच्या लष्करी तळांवर अचूक निशाणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर, अमेरिकन हवाई दल आणि नौदलाच्या लढाऊ विमानांनी ९ जून रोजी इराणवर मोठी लष्करी कारवाई केली. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या बंदर अब्बास, जास्क आणि केशम बेटांवरील हवाई संरक्षण यंत्रणा, जमिनीवरील नियंत्रण केंद्रे आणि पाळत ठेवणाऱ्या रडार स्थळांना अचूक दारुगोळा वापरून उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईनंतर आमचे ध्येय साध्य झाले आहे, अशी घोषणा सेंटकॉमने केली आहे.

‘अपाचे’ हेलिकॉप्टर पाडल्याचा वाद

या युद्धसदृश परिस्थितीची ठिणगी एका हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे पडली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेचे एक अपाचे हेलिकॉप्टर पाडले. या घटनेला २४ तास उलटण्यापूर्वीच अमेरिकेने ही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. आम्ही केलेला हा हल्ला संपूर्णपणे आत्मसंरक्षणासाठी आणि आमच्या सैन्यावरील तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी करण्यात आला. आमचे सैन्य कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

हल्ल्यासाठी बहाणा शोधला 

तर दुसरीकडे, इराणने अमेरिकेचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. आपण अमेरिकेचे कोणतेही अपाचे हेलिकॉप्टर पाडलेले नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. अमेरिकेला इराणवर लष्करी हल्ला करायचाच होता आणि त्यासाठीच त्यांनी या खोट्या घटनेचा बहाणा म्हणून वापर केला, असा थेट आरोप इराणने केला आहे. या मोठ्या लष्करी संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि सागरी व्यापारी मार्गांवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जगाची चिंता का वाढली?

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतुकीचा मार्ग आहे. जगातील एकूण खनिज तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे २० ते २५ टक्के तेल याच मार्गाने इतर देशांमध्ये जाते. आता अमेरिका आणि इराणमध्ये थेट युद्ध पेटल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव प्रचंड वाढू शकतात, ज्यामुळे भारतासह संपूर्ण जगामध्ये महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या अमेरिकन सैन्य हाय-अलर्टवर असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार