अमेरिकेत कोरोना विषाणूचा संसर्ग चीनपूर्वी? अमेरिकेतील संस्थेच्या अहवालात दावा

अमेरिकेतील सीडीसी रिपोर्टनुसार अमेरिकेमध्ये पहिल्यांदा 2019 च्या  डिसेंबर महिन्यात कोरोना संसर्ग झाला होता. US CDC Corona China

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:54 AM, 2 Dec 2020
US CDC Corona China

वॉशिंग्टन: कोरोना विषाणू संसर्गामुळं जगातील सर्व देशांच्या विकासावर परिणाम झाला. जगभरातील 6 कोटींहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला. तर 14 लाखांहून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. कोरोना विषाणू चीनच्या वुहान शहरात झाल्याचा दावा करण्यात येत होता. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या व्हायरसला चायनीज व्हायरस म्हणाले होते. मात्र, अमेरिकेतील एका संस्थेने वेगळाच दावा केला आहे. कोरोना विषाणू संसर्गानंतर चीन जगातील सर्वच देशांच्या निशाण्यावर आला होता. चीनमधील वुहान शहरात कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संस्थांनी केला होता. मात्र, अमेरिकेतील एका संस्थेच्या अहवालात या दाव्याचे खंडण करण्यात आले आहे. (US CDC report denied origin of corona from China)

अमेरिकेतील सीडीसी रिपोर्टनुसार कोरोनाचा संसर्ग चीनमध्ये होण्यापूर्वी अमेरिकेत झाला होता. अमेरिकेमध्ये 2019 च्या  डिसेंबर महिन्यात कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर चीनमध्ये कोरोना संसर्ग झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शन अमेरिकन रेड क्रॉसनं 7389 जणांच्या रक्ताचे नमुने एकत्र केले होते. त्यापैकी 106 जण कोरोना संक्रमित आढळले . हे नमुने 13 डिसेंबर ते 17 जानेवारी दरम्यान घेण्यात आले होते. रिपोर्टमधील दाव्यानुसार अमेरिकेत चीनपूर्वी कोरोना संसर्ग झाल्याचा दावा करण्यात आलाय. (US CDC report denied origin of corona from China)

कोरोनाची सुरुवात भारतात झाल्याचा चीनचा दावा

चीनच्या अकादमी ऑफ सायन्सेसमधील वैज्ञानिकांच्या एका गटाने म्हटलं आहे की, बहुधा 2019 च्या उन्हाळ्यात कोरोना विषाणूचा भारतात जन्म झाला असावा. कोरोना विषाणू जनावरांमुळे दूषित झालेल्या पाण्याद्वारे मानवांमध्ये प्रवेश करतो. भारतात तसंच झालं आणि त्यानंतर हा विषाणू चीनच्या वुहान शहरात पोहोचला. तिथेच या विषाणूची ओळख पटवण्यात संशोधकांना यश आलं.

भारतावर आरोप करण्यापूर्वी चीनमधील संशोधकांनी फिलोजेनेटिक विश्‍लेषण (कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो, याबाबतचा अभ्यास) सादर केलं आहे. ज्या व्हायरसचे कमी म्युटेशन झालं आहे त्यांचा शोध घेऊन व्हायरसचा स्रोत समजू शकतो, असे या वैज्ञानिकांनी या विस्लेषणात म्हटले आहे. (US CDC report denied origin of corona from China)

चीनी संशोधक म्हणाले की, वुहानमध्ये सापडलेला कोरोना व्हायरस पहिला व्हायरस नव्हता. हा व्हायरस बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्‍ट्रेलिया, भारत, इटली, चेक रिपब्लिक, रशिया किंवा सर्बिया यापैकी कुठल्यातरी देशात निर्माण झाला असावा. यापैकी भारत आणि बांगलादेश हे चीनच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे यापैकी एका देशातून कोरोना व्हायरसचा प्रसार होऊन तो व्हायरस वुहानपर्यंत पोहोचला असल्याची दाट शक्यता आहे. हा व्हायरस जुलै किंवा ऑगस्ट 2019 मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाला असावा, असे अनेक अंदाज चिनी संशोधकांनी व्यक्त केले आहेत.

संबंधित बातम्या :

चोराच्या उलट्या बोंबा; कोरोना विषाणूचा जन्म भारतात झाला, चिनी संशोधकांचा दावा

…अन् ‘त्या’ एका चुकीमुळे ऑक्सफर्डची लस अधिक परिणामकारक असल्याचा लागला शोध

(US CDC report denied origin of corona from China)