
अमेरिका भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या बाबतीत नेहमीच दुटप्पी भूमिका घेत आला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात अमेरिकेने कधीही ठामपणे भारताच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही. अमेरिकेने नेहमीच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना खेळवलं आहे. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पाकिस्तानच्या जास्तच जवळ गेले आहेत. पहिल्या टर्ममध्ये ते निदान दहशतवाद विरोधाच्या मुद्यावर भारताचं समर्थन करायचे. पण दुसऱ्या कार्यकाळात भारताने ठामपणे त्यांना ऑपरेशन सिंदूरच श्रेय देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी रशियन तेलाच्या नावाखाली भारतावर 50 टक्क टॅरिफ लावला. पाकिस्तानचे स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना लंचसाठी व्हाइट हाऊसमध्ये बोलावलं. भारताला दुखावणारा प्रत्येक निर्णय त्यांनी घेतला. आता ट्रम्प प्रशासनाने त्यापुढे जात पाकिस्तानच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे भारताला अधिक सर्तक होण्याची गरज आहे. ट्रम्प प्रशासनाने दगाबाजी केली आहे. त्यांनी पाकिस्तानला सैन्य मदत आणि सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. ‘द हिंदू’ वेबसाइटने हे वृत्त दिलय. पाकिस्तानला टेक्नेलॉजी अपग्रेड म्हणजे सुधारणा आणि त्यांच्याकडे असलेल्या F-16 ताफ्यातील विमानांची उड्डाण सुरु रहावीत यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 686 मिलियन अमेरिकी डॉलर्सचा हा करार आहे. या व्यवहाराला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. यामुळे प्रादेशिक लष्करी संतुलन बदलणार नाही, असा सुद्धा अमेरिकेचा दावा आहे.
मंजुरीची प्रक्रिया सुरु झाली
“प्रस्तावित करारामुळे पाकिस्तानची क्षमता वाढणार नाही तसचं प्रादेशित लष्करी संतुलन बिघडणार नाही असा. भारत आमचा मुख्य संरक्षण भागीदार आहे. भारतासोबत आमची रणनितीक भागीदारी आहे” असं अमेरिकन दूतावासाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. डील अजून फायनल झालेली नाही. पण मंजुरीची प्रक्रिया सुरु झाली आहे.
भारताविरोधात वापरली विमानं
पाकिस्तानकडे अमेरिकेने दिलेली F-16 फायटर जेट्स आहेत. अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये जो करार झालाय त्यानुसार पाकिस्तानला ही विमान फक्त दहशतवाद विरोधी कारवाईत वापरायची आहेत. पण पाकिस्तानने 2019 साली एअर स्ट्राइकनंतर भारताविरोधात ही F-16 विमान वापरली होती. आताही ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानने ही विमानं वापरण्याचा प्रयत्न केला. ही अत्याधुनिक विमानं आहेत. या जेट्समध्ये BVR म्हणजे दुश्यापलीकडचा लक्ष्यभेद करण्याची क्षमता आहे.