भारतीय लष्कराला संशय येताच डोनाल्ड ट्रम्प यांचे हातवर, अमेरिकेच्या लष्कराचे विमान थेट पाकिस्तानात, धक्कादायक माहिती पुढे..
डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संवाद बंद असला तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर काैतुकांचा वर्षाव केला. त्यानंतर मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे काहीतरी मोठा गेम करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट आहे. आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

सध्याच्या परिस्थितीला भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध ताणले आहेत. फक्त संबंध; ताणले असे नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला थेट धमकावताना दिसत आहेत. अमेरिकेच्या भूमीवरून भारताला परमाणू हल्ल्याची धमकी पाकिस्तानने दिली. भारतावर डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. भारत आणि अमेरिकेमध्ये वाद लावू पाकिस्तान बघ्याच्या भूमिकेत आहे. दुसरीकडे चीन आणि रशिया भारताच्या समर्थनार्थ थेट मैदानात उतरली आहेत. अमेरिकेच्या विरोधात चीन देखील आपली भूमिका मांडतोय. चीन, रशिया आणि भारत एकत्र आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगाची आग उठली. अमेरिकेमध्ये लोकांचा धाड..धाड नोकऱ्या जात असताना आता डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानला हाताला धरून भारताच्या विरोधात मोठा कट रचत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानचा इतका जास्त पुळका उठला आहे की, पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरानंतर थेट अमेरिकेतून मदत पाठवली आहे. अमेरिकन हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर III विमान पहाटे पाकिस्तानातील नूर खान एअरबेसवर उतरल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. यानंतर भारताची सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. अमेरिकेचे हे सैन्य विमान नेमके पाकिस्तानच्या महत्वाच्या युद्ध एअरबेसवर का आले याचा तपास सुरू होता. अमेरिका पाकिस्तानसोबत मिळून कट रचत असल्याचा दावाही करण्यात आला.
आता इस्लामाबादचे अमेरिकी दूतावास यांनी यावर भाष्य केले. पाकिस्तानी सैन्याच्या मागणीनुसार, आमच्या सैन्याच्या विमानाने रावलपिंडी येथील नूर खान एअरबेसवर मदत पोहोचवली. पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरानंतर येथील सैन्याने मदत मागितली होती. आता त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू आल्या आहेत. पाकिस्तानी लोकांबद्दल संवेदनशिलता व्यक्त करतो. अमेरिकेतून पाकिस्तानमध्ये जनरेटर, तंबू आणि यासोबतच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू यासोबतच खाण्याचे साहित्य पाठवण्यात आले.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारताने याच नूर खान एअरबेसवर हल्ला चढवला होता. त्यावेळी मोठे नुकसान झाल्याचेही सांगितले जाते. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यामध्येच सध्याच्या स्थितीला अमेरिकेसोबतही संबंध चांगले नाहीत. अमेरिका अशाप्रकारची मदत करून पाकिस्तानला हाताला धरत आहे. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात काहीतरी वेगळीच शिजत असल्याचेही बोलले जात आहे. दुसरीकडेप प्रत्येक आव्हानासाठी भारत देखील तयार आहे.
