
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर जगभरातील घडामोडींना वेग आलाय. भारताने अमेरिकेला धक्का देत थेट रशियासोबत महत्वाचे करार केले, ज्याला अमेरिकेचा विरोध होता. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन हे दोघेही चीनमधील एससीओ शिखर संमेलनात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. भारताबद्दल भडकावू भाषा वापरणारी अमेरिका आता ताळ्यावर आल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेकडून भारताला थेट रशियाचे कपडे धुण्याचे मशिन म्हणण्यात आले होते, त्याच अमेरिला आता भारतासोबतची मैत्री आठवत आहे.
नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने भारत आणि वॉशिग्टन यांच्याबद्दलच्या मैत्री विषयी एक अत्यंत मोठी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोस्टमध्ये अमेरिकन दूतावासाने म्हटले की, भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही 21 व्या शतकातील परिभाषितील नाते आहे. हे नाते सतत नवीन उंची गाठत नक्कीच आहे. या भागीदारीचा पाया दोन्ही देशांच्या लोकांमधील मैत्रीवर आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही एक निवेदन जारी केले आहे.
भारत आणि अमेरिकेतील लोकांमधील हीच खोल मैत्री आमच्या भागीदारीचा पाया असल्याचे त्यांनी म्हटले. हेच आम्हाला पुढे नेत आणि आमच्या आर्थिक भागीदारीच्या अफाट शक्यतांना साकार करते, असे त्यांनी देखील आपल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे. चीनमधून नरेंद्र मोदी आणि पुतिन यांचे फोटो पुढे आल्यानंतर अमेरिकेला मोठा धक्का बसल्याचे यावरून आता स्पष्ट दिसत आहे. भारताबद्दल आग ओकणाऱ्या अमेरिकेची भाषाच बदलल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.
The partnership between the United States and India continues to reach new heights — a defining relationship of the 21st century. This month, we’re spotlighting the people, progress, and possibilities driving us forward. From innovation and entrepreneurship to defense and… pic.twitter.com/tjd1tgxNXi
— U.S. Embassy India (@USAndIndia) September 1, 2025
रशिया आणि चीनसोबत भारताची जवळीकता वाढल्याने आता अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन वाढल्याचे दिसत आहे. रशियाकडून भारताने तेल खरेदी करू नये, याकरिता दबाव टाकला जात होता. मात्र, हा दबाव त्यांच्यावरच उलटा पडल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे. भारतासमोर नाक रगडून भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीबद्दल बोलताना आता अमेरिका स्पष्टपणे दिसत आहे. भारताची वाढती जवळीक पाहता वॉशिंग्टनने एक पाऊल मागे टाकल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे.