AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेकडून युद्धात अत्यंत मोठी घोषणा, जगात खळबळ, थेट होर्मुज खाडीत इराणचे..

इराण आणि अमेरिका युद्धात स्थिती बिकड आहे. युद्ध थांबवण्याकरिता पाकिस्तान पुढे आला. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. होर्मुज खाडीत जहाजे जप्त केली जात आहेत. यादरम्यानच अमेरिकेकडून अत्यंत मोठा दावा करण्यात आला आहे.

अमेरिकेकडून युद्धात अत्यंत मोठी घोषणा, जगात खळबळ, थेट होर्मुज खाडीत इराणचे..
press secretary karoline leavitt
| Updated on: Apr 23, 2026 | 10:39 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक चिघळत आहे. होर्मुज खाडीत तणाव आहे. त्यामध्येच होर्मुज खाडीतून गुजरातच्या दिशेने निघालेले जहाज इराणकडून जप्त करण्यात आले. हेच नाही तर होर्मुज खाडीत इराणकडून गोळीबारही केला जात आहे. नौदल हालचाली, नाकेबंदी यामुळे स्थिती पुर्वीपेक्षा अधिक घातक आहे. सध्या ज्याप्रकारे इराण होर्मुज खाडीत आक्रमक झाला, त्याला थेट अमेरिकेने समुद्री डांकूसारखे इराण वागत असल्याचे म्हटले.  इराणने अमेरिकेच्या नाकेबंदीचा थेट युद्धजन्य कृत्य म्हणून निषेध केला आहे. होर्मुज खाडीत अमेरिकेकडून करण्यात आलेल्या नाकेबंदीमुळे तणाव कमी व्हायचा तर अधिक वाढला आहे. स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. अमेरिकेने इराणी जहाज जप्त केले. त्यानंतर वेगवेगळ्या देशांचे दोन जहाज इराणनेही जप्त केले, त्यापैकी एक जहाज गुजराजच्या दिशेने निघाले होते.

व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी नुकताच इराणवर गंभीर आरोप केले. इराणी नौदल मध्य पूर्वेत सर्वात जास्त धोकादायक बनल्याचे त्यांनी म्हटले. समुद्री डांकूच्या टोळीसारखे ते वागत आहेत. यादरम्यान जगाची झोप उडवणारा दावा करण्यात आला. होर्मुज खाडीत इराणचे कोणतेही नियंत्रण नसल्याचा खळबळजनक दावा, यावेळी त्यांनी केला. अमेरिकेने केलेली नाकेबंदी प्रभावित ठरत असल्याची दावा त्यांनी केला.

लेविट यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांचे उदिष्ट स्पष्ट आहे. अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना धमकावण्यासाठी इराण कधीही अणुबॉम्ब मिळवू शकत नाही. इराणने आपल्याकडील संवर्धित युरेनियम अमेरिकेच्या हवाली केलेच पाहिजे, अमेरिकेची ही मागणी जोपर्यंत इराण पूर्ण करत नाही, तोपर्यंत युद्धबंदी शक्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धबंदीची बैठक पाकिस्तानमध्ये होती. मात्र, अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या धमक्यांनंतर इराणकडून या बैठकीला हजर राहणार नसल्याची भूमिका घेण्यात आली. मंगळवारी ही बैठक इस्लामाबादमध्ये होती. मात्र, त्यापूर्वी होर्मुज खाडीमध्ये कमालीचा तणाव बघायला मिळाला. या तणावानंतर इराणकडून स्पष्ट भूमिका घेत सांगण्यात आले की, ते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल