AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US-Iran : इराणला मूळापासून हादरवणार, मेगा स्ट्राइकसाठी अमेरिकेची खतरनाक प्लानिंग, इस्रायल असणारं महत्वाचं लोकेशन

US-Iran : हॉर्मुज स्ट्रेट आणि इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर अमेरिकेचे हल्ले सलग सातव्या दिवशीही सुरु होते. अमेरिकेने बंदर अब्बास जवळचे सात पूल उद्धवस्त केले. बंदर अब्बास इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच मुख्य लॉजिस्टिक हब आहे.

US-Iran : इराणला मूळापासून हादरवणार, मेगा स्ट्राइकसाठी अमेरिकेची खतरनाक प्लानिंग, इस्रायल असणारं महत्वाचं लोकेशन
US Jets
| Updated on: Jul 18, 2026 | 4:25 PM
Share

अमेरिका इराण विरुद्ध सैन्य कारवाई अजून तीव्र करण्याच्या तयारीत आहे. याच रणनितीमुळे अमेरिका इराणमध्ये अतिरिक्त एअर-टू-एअर रिफ्यूलिंग विमानं पाठवत आहे. लांब पल्ल्याची फायटर जेट्स आणि बॉम्बर विमानांचं मिशन न थांबवता सुरु ठेवण्याची रणनिती यामागे आहे. इस्रायलमध्ये आधीपासूनच 60 पेक्षा जास्त अमेरिकी रिफ्यूलिंग विमानं आहेत. एक्सियोसच्या रिपोर्टनुसार वॉशिंग्टनने इस्रायलला या मोठ्या तैनातीची माहिती कळवली आहे. अमेरिकेचा हा नवीन वॉर प्लान काय आहे, समजून घेऊया. जमिनीवरील परिस्थिती काय आहे, या विमानांमुळे इस्रायलमधील देशांतर्गत राजकारण का तापलं आहे?.

इस्रायलमध्ये आधीपासून अमेरिकेची 60 रिफ्यूलिंग विमानं तैनात आहेत. 30 विमानं तेल अवीवच्या बेन गुरियन इंटरनॅशनल एअरपोर्टवर आहेत. 30 विमानं दक्षिण इस्रायलच्या रेमन एअरपोर्टवर आहेत. येणाऱ्या दिवसात पेंटागन आणखी विमानं इस्रायलमध्ये पाठवण्याच्या तयारीत आहे. युद्ध सुरु झाल्यानंतर जितकी विमान संख्या होती, त्याच लेव्हलला विमानं आणण्याची योजना आहे. पेंटागनला ही विमानं बेन गुरियन एअरपोर्टवर तैनात ठेवायची आहेत. कारण या भागातील अन्य एअरबेसवर इराणकडून मिसाइल आणि ड्रोन हल्ल्याची भिती जास्त आहे.

सात पूल उद्धवस्त

हॉर्मुज स्ट्रेट आणि इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर अमेरिकेचे हल्ले सलग सातव्या दिवशीही सुरु होते. अमेरिकेने बंदर अब्बास जवळचे सात पूल उद्धवस्त केले. बंदर अब्बास इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच मुख्य लॉजिस्टिक हब आहे. तिथूनच हॉर्मुजमध्ये दारु गोळा आणि अन्य रसद पुरवली जाते.

इस्रायलमधील देशांतर्गत राजकारण तापलं

अमेरिकेच्या या सैन्य तयारीमुळे इस्रायलमधील देशांतर्गत राजकारण तापलं आहे. युद्ध टिपेला पोहोचलेलं असताना इस्रायलचा एअरस्पेस बंद होता. त्यावेळी बेन गुरियन एअरपोर्टवरील अमेरिकी विमानांची उपस्थिती काही मुद्दा नव्हता. पण आता इस्रायलमध्ये उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत. कमर्शियल उड्डाणं सुरु आहेत. विशालकाय अमेरिकी सैन्य विमानांच्या पार्किंगमुळे प्रवासी विमान उड्डाणं रद्द होण्याची शक्यता आहे. इस्रायलमध्ये तीन महिन्यांनी निवडणुका आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे सहकारी आणि परिवहन मंत्री मिरी रेगेव यांनी बेन गुरियन विमानतळावरुन ही विमानं हटवावी किंवा त्यांची संख्या मर्यादीत करावी अशी मागणी केली आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार