AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

I Love Modi.. पण पाठिमागून वार, रशियाच भारताचा मित्र, अमेरिकेला..

मागील काही महिन्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावात आहेत. डोनाल्ड ट्रम्प भारताबद्दल कधी काय बोलतील, याचा अजिबातच नियम नाही. काल परवाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठे विधान करत काैतुक केले. त्यापूर्वीच भारताला नर्क म्हटले.

I Love Modi.. पण पाठिमागून वार, रशियाच भारताचा मित्र, अमेरिकेला..
Marco Rubio visit to India
| Updated on: May 27, 2026 | 10:45 AM
Share

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्काे रूबियो भारत दाैऱ्यावर होते. चार दिवसांचा त्यांचा हा भारत दाैरा होता. भारत आणि अमेरिका यांच्या संबंधात गेल्या काही दिवसांपासून सतत चढउतार बघायला मिळतोय. हे संबंध मजबूत करण्याकरिता मार्काे रूबियो भारत दाैऱ्यावर आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट जगातील नर्क भारताला म्हटले होते. यावेळी त्यांनी चीनच्याही नावाचा उल्लेख केला होता. भारताला नर्क म्हटल्याने कुठे ना कुठे संबंध तणाव होता. एकीकडे I Love Modi म्हणायचे तर दुसरीकडे भारताच्या पाठित खंजीर खुपसायचे हे काम अमेरिकेचे सुरू आहे. अमेरिकेने H1B व्हिसा आणि ग्रीन कार्डच्या नियमात मोठा बदल केला. H1B व्हिसाच्या नियमात बदल केल्याने भारताला मोठा दणका बसला. टॅरिफ आणि रशिया भारताच्या मैत्रीहून भारतावर दबाव टाकण्याचेही काम अमेरिकेने केले.

पाकिस्तानसोबत जास्त मैत्री देखील अमेरिका वाढत आहे, ज्याने भारत चिंतेत आहे. एकीकडे I Love Modi च्या घोषणा द्यायच्या आणि दुसरेकडे बंद खोलीत व्यापार करारकरिता भारतावर दबाव टाकायचा हे अमेरिका करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वीच भारताबद्दल आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठे विधान केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मला खूप आवडतात, असेही म्हटले.

गेल्या काही वर्षाच्या तुलनेत भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत झाल्याचे त्यांनी म्हटले. भारत आमच्यावर 100 टक्के विश्वास ठेऊ शकतो, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेवर विश्वास ठेवणे कठीण आहे. अमेरिका कधी धोका देईल, हे सांगता येत नाही. रशियाचे तेल खरेदी करू नये, याकरिता अमेरिकेचा अजूनही एक मोठा दबाव भारतावर आहे.

शिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये भारत आणि रशिया यांच्यातील संबंध दूर करण्याकरिता अमेरिका प्रयत्न करत आहे. मार्काे रूबियो भारत दाैऱ्यावर आले खरे मात्र, त्यांना जे काही अपेक्षित होते ते काहीच मिळाले नाही. अमेरिकेने जरी भारत 100 टक्के विश्वास आमच्यावर ठेऊ शकतो, असल्याचे म्हटले पण सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत अमेरिकेने 1 टक्काही विश्वास ठेऊ शकत नाही.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...