AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणनंतर अमेरिका आता पाकिस्तानवर हल्ला करणार? शाहबाज-मुनीर चिंतेत, घेतला मोठा निर्णय

इराण आणि इस्रायलमधील युद्धात अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानची चिंता वाढली आहे.

इराणनंतर अमेरिका आता पाकिस्तानवर हल्ला करणार? शाहबाज-मुनीर चिंतेत, घेतला मोठा निर्णय
Sharif and Munir
| Updated on: Jun 23, 2025 | 3:44 PM
Share

इराण आणि इस्रायलमधील युद्धाने जगाची चिंता वाढवली आहे. अमेरिकेने या युद्धात उडी घेतली असून इराणवर हल्ला केला आहे. त्यामुळे आता इतरही देश या युद्धात उतरण्याची शक्यता आहे. अनेक देशांनी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. पाकिस्ताननेही अमेरिकेचा हल्ला हा आंतरराष्ट्रीय़ कायद्याचे उल्लंघन आहे असं म्हटलं आहे.

पाकिस्तानचा मोठा निर्णय

इराणच्या तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर अमेरिकेने हल्ला केला होता. त्यामुळे आता भारताच्या शेजारील देश पाकिस्तानही घाबरला आहे. पाकिस्तानने इराणची बाजू घेतल्याचे पाकिस्तानवर अमेरिका हल्ला करणार अशी भीती पाकिस्तानला आहे. त्यामुळे पाकिस्तानने मोठा निर्णय घेत आज (सोमवार) राष्ट्रीय सुरक्षा समितीची (NSC) आपत्कालीन बैठक बोलावली आहे. ही बैठक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीला पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि इतर अधिकारीही सहभागी होणार आहेत.

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने दिलेल्या माहितीनुसार, एनएससीची बैठक सोमवारी संध्याकाळी होणार आहे. लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर या बैठकीत सहभागी होणार आहे. याबैठतीत मुनीर ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती इतर नेत्यांना देणार आहेत. तसेच देशाच्या सुरक्षेसंबंधी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात असीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला होता. पाकिस्तानने इराणवरील या हल्ल्यांवर टीका केली होती. शाहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून चर्चाही केली होती. ‘अमेरिकेचे हल्ले आंतरराष्ट्रीय कायदा आणि IAEA कायद्याचे गंभीर उल्लंघन आहेत’ असं शरीफ यांनी म्हटलं होतं.

आधी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी, नंतर टीका

असीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानने घोषणा केली होती की, ते भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या प्रयत्नांसाठी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी करणार आहेत. मात्र काही दिवसांनंतर अमेरिकेने इराणवर हल्ला केला, त्यामुळे पाकिस्तानने अमेरिकेवर टीका केली. त्यामुळे आता पाकिस्तान नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांचे नाव सुचवणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.