अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी LIVE शोमध्ये घेतली कोरोना लस, सर्वांना लस घेण्याचे आवाहन

अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी LIVE शोमध्ये घेतली कोरोना लस, सर्वांना लस घेण्याचे आवाहन

कमला हॅरिस यांनी स्वत:ला कोरोनाची प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली आहे. (US Vice-President Kamala Harris Takes Moderna Corona Vaccine)

Namrata Patil

|

Dec 30, 2020 | 9:35 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाच्या मोहिम सुरु आहे. अनेक मोठे सेलिब्रेटी या लसीकरणाच्या मोहिमेचा भाग बनत आहे. नुकतंच अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (US Vice President Kamala Harris)  यांचेही नाव या लसीकरणाच्या मोहिमेशी जोडलं आहे. नुकतंच एका सार्वजनिक कार्यक्रमात कमला हॅरिस यांनी स्वत:ला कोरोनाची प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली आहे. (US Vice-President Kamala Harris Takes Moderna Corona Vaccine)

कमला हॅरिस आणि त्यांचे पती डग एमहॉफ (Doug Emhoff) या दोघांनी मंगळवारी कोरोनाची लस टोचून घेतली. वॉशिंग्टनमधील युनायटेड मेडिकल सेंटरमध्ये या दोघांनी मॉडर्ना कोरोना लसीचा (Moderna Corona Vaccine) पहिला डोस घेतला. कोरोनाची लस टोचून घेतल्यानंतर त्यांनी जनतेला लस घेण्याचे आवाहन केले आहे. मला शास्त्रज्ञांवर पूर्ण विश्वास आहे. शास्त्रज्ञांनी ही लस तयार केल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली. म्हणून मी सर्वांना ही लस घ्या, असे आवाहन करते.

कमला हॅरिसने मॉडर्ना कंपनीची कोरोना लस घेतली आहे. मॉडर्ना लसीला ही अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मंजुरी दिली आहे. अमेरिका हा देश कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे या लसीला मंजुरी मिळाल्यानंतर अमेरिकेत लगेचच लसीकरण करण्यात आले.

मॉडर्ना कंपनीची लस 94 टक्के प्रभावी

अन्न आणि औषध प्रशासनाने ही लस विकसित करतेवेळी 30 हजार लोकांवर कोरोनाची चाचणी करण्यात आलीह होती. त्यावेळी ही लस 94.1 टक्के प्रभावी ठरली होती. मात्र या लसीच्या प्रयोगानंतर अनेक लोकांना ताप, डोकेदुखी आणि थकवा असे साईड इफेक्ट समोर आले होते. मात्र शास्त्रज्ञांनी ही लस धोकादायक नसल्याचे सांगितले होते. (US Vice-President Kamala Harris Takes Moderna Corona Vaccine)

संबंधित बातम्या : 

सीरमच्या लसीला मंजुरी मिळणार का? महत्त्वाच्या बैठकीकडे देशाचे लक्ष

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका कायम; मोदी सरकारचा मोठा निर्णय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें