AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीरमच्या लसीला मंजुरी मिळणार का? महत्त्वाच्या बैठकीकडे देशाचे लक्ष

सिरमच्या या अर्जावर भारतीय औषध नियंत्रक यंत्रणेने नेमलेल्या विशेष तज्ज्ञ समितीची बैठक सुरु आहे. | Oxford University AstraZeneca

सीरमच्या लसीला मंजुरी मिळणार का? महत्त्वाच्या बैठकीकडे देशाचे लक्ष
| Edited By: | Updated on: Dec 30, 2020 | 4:34 PM
Share

नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुप्रतीक्षित असलेल्या सीरमच्या (Serum Institute COVID19 vaccine) लसीला भारतात लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यातच सीरम इन्स्टिट्युटने लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. सीरमच्या या अर्जावर भारतीय औषध नियंत्रक यंत्रणेने नेमलेल्या विशेष तज्ज्ञ समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीत सीरमच्या लसीला मान्यता देण्याचा निर्णय होऊ शकतो. (Oxford University AstraZeneca Covid 19 vaccine may approved in India)

तत्पूर्वी बुधवारी ब्रिटीश सरकारकडून ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेन्का (Oxford/AstraZeneca) लसीच्या वापराला मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांसाठी मॉडर्ना पाठोपाठ आणखी एक लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता भारतातही ऑक्सफर्डच्या लशीला मान्यता मिळण्याची शक्यता वाढली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या या लसीची सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्मिती आणि वितरण केले जाणार आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने का परवानगी दिली नव्हती?

सीरम इन्स्टिट्यूटने यापूर्वीही लसीच्या आपातकालीन वापरासाठी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे अर्ज केला होता. याशिवाय, भारत बायोटेक आणि फायझरकडून आपापल्या लसीच्या आपातकालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, भारतीय औषध महानियंत्रकांकडून नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीकडून या तिन्ही कंपन्यांकडे लसीसंदर्भातील अधिक तपशील मागवण्यात आले होते. जेणेकरुन या लसींच्या परिणामकारकतेची नेमकी खात्री पटवता येईल. तज्ज्ञ समितीच्या या भूमिकेनंतर सीरम, भारत बायोटेक आणि फायझरने आणखी वेळ मागितला होता. त्यामुळे भारतातील कोरोना लसीकरण मोहीम  लांबणीवर पडली होती.

देशभरात लसीकरण मोहिमेची जय्यत तयारी

कोरोनाच्या लसीला मंजुरी मिळाली नसली तरी भारतातील बहुतांश राज्यात लसीकरणाची संपूर्ण तयारी आहे. गुजरात, पंजाब, आसाम आणि आंध्र प्रदेशा या राज्यांमध्ये काही दिवसांपूर्वीच लसीकरणाची ‘ड्राय रन पार पडली होती. कोरोनाची लस मिळणारे उत्तर प्रदेश हे पहिले राज्य ठरु शकते. त्यादृष्टीने उत्तर प्रदेशात जय्यत तयारी झाली आहे. कोविडची लस साठवण्याबरोबरच ती कशाप्रकारे द्यायची याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले होते.

संबंधित बातम्या:

…अन् ‘त्या’ एका चुकीमुळे ऑक्सफर्डची लस अधिक परिणामकारक असल्याचा लागला शोध

मोदी सरकारचा सीरम कंपनीशी करार; कोरोनाची लस अवघ्या 250 रुपयांत मिळणार

आनंदाची बातमी: कोरोनाच्या नव्या रुपामुळे धास्तावलेल्या ब्रिटनला दिलासा; कोरोनाच्या आणखी एका लशीला मंजुरी

(Oxford University AstraZeneca Covid 19 vaccine may approved in India)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.