ट्रम्प यांनी मादुरो यांना उचललं, आता आणखी 4 देशांचे प्रमुख हिट लिस्टवर; अमेरिका करणार गेम?
अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील कारवाईमुळे आता जगातील आणखी 4 देशांच्या राष्ट्रपतींच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यातील 2 नेते हे भारताच्या शेजारील देशातील नेते आहेत आहेत.

अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करत राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली आहे. मादुरो यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. या अटकेनंतर आता अमेरिका व्हेनेझुएलामध्ये सत्ताबदल करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या या कारवाईमुळे आता जगातील आणखी 4 देशांच्या राष्ट्रपतींच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यातील 2 नेते हे भारताच्या शेजारील देशातील नेते आहेत आहेत. व्हेनेझुएलासारखे हे चारही देश बऱ्याच काळापासून अमेरिकेच्या रडारवर आहेत. त्यामुळे आता आगामी काळात या देशांवरही हल्ला होण्याची शक्यता आहे.
कोणते नेते अमेरिकेच्या रडारवर?
गुस्तावो पेट्रो – कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो हे अमेरिकेच्या रडारवर आहेत. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पेट्रो यांना धमकी दिलेली आहे. ट्रम्प म्हणाले होते की, ‘पेट्रोने स्वतःच्या जीवाची काळजी करावी.’ व्हेनेझुएलाप्रमाणेच कोलंबियावरही ड्रग्ज तस्करीचा आरोप आहे. कोलंबिया सरकार तस्करांना प्रोत्साहन देते ज्याचा फटका अमेरिकेला बसतो असा ट्रम्प यांचा आरोप आहे. त्यामुळे ट्रम्प आता गुस्तावो पेट्रो यांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
अली खामेनी – अली खामेनी हे इराणचे सर्वोच्च आणि सर्वात शक्तिशाली नेते आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते अमेरिकेच्या रडारवर आहेत. सध्या इराण सरकारविरोधात आंदोलन सुरू आहेत. त्यामुळे अमेरिकेने इराणमध्ये घुसण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे व्हेनेझुएलानंतर अमेरिका इराणकडे मोर्चा वळवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अमेरिका इस्रायलच्या खांद्यावर बंदूक ठेवून इराणवर कारवाई करण्याची शक्यता आहे.
हिबतुल्लाह अखुंजादा – तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्लाह अखुंजादा हा देखील अमेरिकेच्या निशाण्यावर आहे. अमेरिका अखुंजादाला दहशतवादी मानते, तसेच अमेरिकेचा तालिबान राजवटीलाही विरोध आहे. अमेरिका तालिबानमधील बग्राम एअरबेस परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अफगाणिस्तानचा याला विरोध आहे. त्यामुळे भारताच्या या शेजारील देशावर अमेरिका हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मिन आंग ह्लाईंग – अमेरिका म्यानमारचे लष्करी प्रमुख आणि हुकूमशहा मिन आंग लायंग यांची हत्या करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेने लायंग यांच्यावर निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी दबाव टाकलेला आहे. मात्र लायंग हुकूमशाही पद्धतीने सत्ता धारण करत आहेत. त्यामुळे अमेरिका भारताच्या पूर्वेकडील देशावर कधीही हल्ला करण्याची शक्यता आहे.
