Anil Agarwal Son Death : एका बापाच्या खांद्यावर मुलाची अत्यंयात्रा, यापेक्षा… प्रसिद्ध उद्योगपती अनिल अग्रवाल यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
Anil Agarwal Son Death : अग्निवेशने अजमेरच्या मेयो कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं. अनिल अग्रवाल यांच्यानुसार अग्निवेशची पर्सनॅलिटी खूप सुंदर होती. तो बॉक्सिंग चॅम्पियन होता. त्याला घोडेस्वारीची आवड होती. सुंदर म्यूजिशियन होता.

वेदांता ग्रुपचे चेअरमन आणि उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्यावर बुधवारी दु:खाचा डोंगर कोसळला. 49 वर्षांचा मुलगा अग्निवेश यांच्या निधनाने अनिल अग्रवाल पूर्णपणे खचून गेले आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट करुन अनिल अग्रवाल यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली. अग्रवाल यांनी मुलाशी संबंधित आठवणी शेअर केल्या. मुलाला दिलेला शब्द पूर्ण करणार असल्याचं सांगितलं. ‘एका बापाच्या खांद्यावर मुलाची अत्यंयात्रा’, यापेक्षा वाईट काय असू शकतं? असं अग्रवाल यांनी लिहिलं आहे. वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेशचं बुधवारी अमेरिकेत निधन झालं. अग्निवेश अमेरिकेत स्कीइंगसाठी गेला होता. तिथे एका दुर्घटनेत तो गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर त्याला न्यू यॉर्कच्या माउंट सायनाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान अचानक कार्डिक अरनेस्टने त्याचा मृत्यू झाला.
मुलाच्या मृत्यूनंतर अनिल अग्रवाल यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली. “आज माझ्या आयुष्यातील खूप दु:खद दिवस आहे. माझा अग्निवेश 49 वर्षांचा मुलगा, आज आपल्यामध्ये नाहीय. एका बापाच्या खांद्यावर मुलाची अत्यंयात्रा’, यापेक्षा वाईट काय असू शकतं?” असं अग्रवाल यांनी लिहिलं आहे. अग्निवेश आपल्या एका मित्रासोबत अमेरिकेत स्कीइंग करण्यासाठी गेला होता. तिथे दुर्घटना घडली. न्यू यॉर्कच्या माउंट साइनाई हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. सर्वकाही व्यवस्थित होईल असं मला वाटलं. पण त्याला अचानक कार्डिक अरेस्टचा झटका आला. त्यात आमचा मुलगा आम्हाला सोडून गेला, असं त्यांनी म्हटलं आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबात माझ्या अग्निचा जन्म झालेला
अनिल अग्रवाल यांनी आपल्या मुलाच्या आठवणींना उजाळा दिला. 3 जून 1976 रोजी बिहारच्या पाटण्यामध्ये अग्निवेशचा जन्म झाला. तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. एक मध्यमवर्गीय कुटुंबात माझ्या अग्निचा जन्म झालेला. लहानपणापासून तो चंचल, खोडकर आणि हसरा मुलगा होता. अग्नि त्याच्या आईचा खूप लाडका होता. मित्रांचा खूप चांगला मित्र होता. आपली बहिण प्रियाच्या बाबतीत तो जास्त प्रोटेक्टिव होता असं अनिल अग्रवाल यांनी सांगितलं.
फुजैराह गोल्ड सारखी मोठी कंपनी उभी केली
अग्निवेशने अजमेरच्या मेयो कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं. अनिल अग्रवाल यांच्यानुसार अग्निवेशची पर्सनॅलिटी खूप सुंदर होती. तो बॉक्सिंग चॅम्पियन होता. त्याला घोडेस्वारीची आवड होती. सुंदर म्यूजिशियन होता. शिक्षणानंतर त्याने फुजैराह गोल्ड सारखी मोठी कंपनी उभी केली. त्यानंतर हिंदुस्तान जिंकचा चेअरमन बनला.
