America Vs Venezuela : डोनाल्ड ट्रम्प युद्धाच्या तयारीत! व्हेनेझुएलाला समुद्रात घेरलं, आता जग नव्या संकटात?

सध्या अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात वाद चालू आहे. अमेरिकेने कॅरेबियन सागरात विमानवाहू जहाज तैनात केले आहे. तर दुसरीकडे व्हेनेझुएला या देशानेही आपले सैन्य तयार ठेवलेले आहे. त्यामुळे आता युद्ध भडकणार का? असे विचारले जात आहे.

America Vs Venezuela : डोनाल्ड ट्रम्प युद्धाच्या तयारीत! व्हेनेझुएलाला समुद्रात घेरलं, आता जग नव्या संकटात?
america and venezuela war
| Updated on: Nov 12, 2025 | 4:11 PM

America Vnezuels War : अमेरिकेच्या कॅरेबियन सागरातील कारवाईमुळे नवे युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारम ड्रग्ज तस्करांना रोखण्याचा उद्देश समोर ठेवून अमेरिकन सैनिक थेट जहाजांवर हल्ले करत आहेत. या हल्ल्यांत आतापर्यंत 76 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच आता व्हेनेझुएला हा देश थेट अमिरेकेला भिडण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेचा आक्रमक पवित्र लक्षात घेता कॅनडा आणि ब्रिटेन या दोन देशांनीही चिंता व्यक्त केली असू ड्रग्ज तस्करी करणाऱ्या जहाजांची गुप्त माहिती अमेरिकेला पुरवणे या दोन्ही देशांनी थांबवले आहे. अमेरिकेच्या या धोरणामुळे आता व्हेनेझुएलानेही आपले सैन्य तयार ठेवलेले आहे. त्यामुळेच आता अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात युद्ध भडकते की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेकडून कॅरेबियन सागरात कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार आम्ही दिलेली माहिती अमेरिका घातक हल्ले करण्यासाठी वापतो, अशी शंका ब्रिटेनला आहे. त्यामुळेच ब्रिटनने ड्रग्ज तस्करी करणाऱ्या संशयित जहाजांची माहिती अमेरिकेला देणे थांबवले आहे. सोबतच अमेरिकेच्या धोरणावर चिंता व्यक्त केली आहे. सध्ये अमेरिका कॅरेबियन सागरात ज्या काही कारवाया करत आहे, त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, असे ब्रिटन तसेच कॅनडाने अगोदरच स्पष्ट केले आहे. सोबतच अमेरिकेची ही कारवाई म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघ आहे, अशी भूमिकाही ब्रिटनने घेतलेली आहे.

अमेरिकेने विमानवाहू युद्धनौका केली तैनात

कॅरेबियन सागराच्या माध्यमातून अमेरिकेत ड्रग्ज तस्करी केली जाते, असे डोनाल्ड ट्रम्प सरकारला वाटते. त्यासाठीच सप्टेंबर महिन्यात अमेरिकेने कथितपणे मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या जहाजांवर हल्ले केले होते. यात 76 लोकांचा मृत्यू झाला होता. सोबतच ही तस्करी रोखण्यासाठी अमेरिकेने कॅरेबियन सागरात USS Gerald R. Ford ही सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका तैनात केली आहे. ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठीच आमची ही कारवाई चालू आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे.

व्हेनेझुएलानेही कसली कंबर

अमेरिकेच्या चा कारवाईची व्हेनेझुएला या देशाने कठोर शब्दांत टीका केली आहे. अमेरिकेने कॅरेबियन सागरात विमानवाहू जहाज तैनात केल्यानंतर आता व्हेनेझुएलानेही आपले सैन्य सज्ज ठेवले आहे. याबाबत व्हेनेझुएलाचे संरक्षणंत्री व्लादिमीर पाद्रीनो लोपेज यांनी माहिती दिली आहे. आमच्या देशाची नौसेना, वायूसेना आणि भुदल बुधवारी सैन्य अभ्यास करेल, असे सांगितले आहे. त्यामुळे आता अमेरिकेला उत्तर देण्यासाठी व्हेनेझुएला हा देशदेखील सज्ज झाल्याचे बोलले जात जात आहे. त्यामुळेच जगात आता नवे युद्ध भडकणार का? असे विचारले जात आहे.