AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact check : Russia Ukraine युद्धादरम्यान Fake photo आणि Videosचं फुटलं पेव! जाणून घ्या सत्य

Russia Ukraine war : रशिया युक्रेन युद्धादरम्यानही काही फेक (Fake) म्हणजेच खोटे फोटो, व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहेत. यातले अनेक फोटो, व्हिडिओ जुने (Old) आहेत. मात्र ते अशापद्धतीने शेअर केले जात आहेत, जसे काल-परवाचे ताजे आहेत.

Fact check : Russia Ukraine युद्धादरम्यान Fake photo आणि Videosचं फुटलं पेव! जाणून घ्या सत्य
मॉस्को विजय दिनाच्या उत्सवात भाग घेत असलेल्या विमानाचे जुने फोटो ट्विटरवर चुकीच्या पद्धतीने वापरले गेले (सौ. GETTY IMAGES)
| Updated on: Feb 25, 2022 | 3:45 PM
Share

Russia Ukraine war : रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. यात अनेकजण मारले गेल्याच्या बातम्याही आपण वाचत आहोत. तर अशा गंभीर परिस्थितीत काहीजण मात्र अत्यंत बेजबाबदारपणा करत असल्याचे दिसत आहे. कोणतीही एखादी मोठी घटना घडली तर त्याचे फोटो, व्हिडिओ यांच्याशी छेडछाड करण्याच्या घटना घडत असतात. आता रशिया युक्रेन युद्धादरम्यानही काही फेक (Fake) म्हणजेच खोटे फोटो, व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहेत. यातले अनेक फोटो, व्हिडिओ जुने (Old) आहेत. मात्र ते अशापद्धतीने शेअर केले जात आहेत, जसे काल-परवाचे ताजे आहेत. अशाप्रकारचे फोटो-व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक काहीही विचार न करता ते फॉरवर्ड करतात. त्यामुळे अनेकांचा गोंधळ होत आहे. दरम्यान, फॅक्ट चेक करणाऱ्या विविध वृत्तसंस्था, पोर्टल्सच्या बीबीसी आदींच्या मते हे सर्व फेक असून यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही.

US F-16ची जुनी क्लिप पोस्ट

युक्रेन आणि रशियामध्ये तणावाचे वृत्त समोर येताच, यादरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, की जेट फायटर प्लेनने युक्रेनवर हल्ला केला आहे. मात्र, नंतर ही क्लिप हटवण्यात आली. ही क्लिप बारकाईने पाहिली असता अमेरिकेत बनवलेले विमान F-16 असल्याचे निष्पन्न झाले.

F-16

अमेरिकेत बनवलेले विमान F-16

2020च्या लष्करी परेडचा फोटो व्हायरल

नेमकी अशीच एक क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये दावा करण्यात आला होता, की शहरी भागावर लढाऊ आणि बॉम्बर विमाने उडताना दिसत आहेत. पण तपास केला असता हा 2020च्या एअर शोचा फोटो असल्याचे आढळून आले.

पॅराट्रूपर्स युक्रेनमध्ये उतरले!

रशियन पॅराट्रूपर्स युक्रेनमधील खार्किवमध्ये उतरले आहेत, अशी आणखी एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पण 2016मध्ये इंटरनेटवर पहिल्यांदा ती पाहिल्याचे तपासात समोर आले.

2016मध्ये इंटरनेटवर पहिल्यांदा पाहिला गेलेला फोटो

युक्रेनने रशियाचे लढाऊ विमान पाडले, असा दावा

रशियन जेट विमान युक्रेनने पाडले असल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पण बीबीसीच्या तपासात हे लिबिया सरकारचे विमान असल्याचे समोर आले आहे. ज्याची 2011मध्ये बंडखोरांनी हत्या केली होती. या व्हिडिओमध्ये अरबी भाषेत सेलिब्रेशनचे आवाजही ऐकू येत आहेत.

टिकटॉकवर करण्यात आला होता अपलोड

युक्रेनचे अमेरिकेतील राजदूत वोलोदिमीर येलेचेन्को यांनीही एक क्लिप शेअर केली, जी प्रत्यक्षात 29 जानेवारी रोजी टिकटॉकवर अपलोड करण्यात आली होती. हा व्हिडिओ मारियुपोलचा असल्याचा दावा युक्रेनच्या राजदूताने केला होता. या व्हिडिओवर यूझर्सनी प्रश्नही उपस्थित केले आहेत. सर्व यूझर्सनी सांगितले, की त्यात हिरवळ दिसते, तर फेब्रुवारीमध्ये मारियुपोलचे तापमान 0 डिग्रीच्या जवळ आहे. यासह अनेक फोटो, व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने शेअर केली जात आहेत.

3

फोटो मारियुपोलचा असल्याचा दावा चुकीचा

आणखी वाचा :

जड अंत:करणानं पत्नी आपल्या पतीला देतेय निरोप, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान Viral झाला Emotional video

Viral : ‘…तर जग खूप वेगळं असतं’, असं काय म्हणून गेली आणि Troll झाली ‘ही’ American actress?

लेकीला निरोप देताना झाला भावुक! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बाप-लेकीचा Emotional video viral

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.