AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नदीत गेलेल्या मच्छिमाराला माशाऐवजी मिळाली भलतीच गोष्ट, शेपूट हातात आलं अन् बसला धक्का, काळजाचा थरकाप उडवणारा Video

मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे, याचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

नदीत गेलेल्या मच्छिमाराला माशाऐवजी मिळाली भलतीच गोष्ट, शेपूट हातात आलं अन् बसला धक्का, काळजाचा थरकाप उडवणारा Video
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 13, 2025 | 6:23 PM
Share

अ‍ॅमेझॉनच्या जंगलामध्ये महाकाय अ‍ॅनाकोंडा साप आढळतात. अनेकदा त्यांचे थरकाप उडवणारे व्हिडीओ देखील समोर येतात.कधी हिरव्या रंगाचा अ‍ॅनाकोंडा नदीवर तरंगताना दिसून येतो, तर कधी काळ्या रंगाचा अ‍ॅनाकोंडा दिसतो. अ‍ॅनाकोंडाला पाहाताच कोणाचाही थरकाप उडू शकतो, पायाखालची जमीन सरकते. अशीच एक घटना समोर आली आहे. एका मच्छिमाराला नदीत मासेमारी करताना एक विशाल अ‍ॅनाकोंडा दिसला, सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहाणाऱ्याच्या काळजाचा देखील थरकाप उडत आहे.

एक काळ्या रंगाचा विशालकाय अ‍ॅनाकोंडा पाण्यावर तरंगताना दिसून येत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये मच्छिमार नाही तर तो अ‍ॅनाकोंडा घाबरल्याचं पाहायला मिळत आहे. अ‍ॅनाकोंडा आपला जीव वाचवण्यासाठी या बोटीच्या पुढे पळत आहे. तर मच्छिमाराची बोट या अ‍ॅनाकोंडाचा पाठलाग करत आहे. अ‍ॅनाकोंडा प्रचंड वेगानं पुढे पळत आहे, या व्हिडीओमध्ये नंतर असं दिसून येत आहे की, या मच्छिमारानं अ‍ॅनाकोंडाचं शेपूट आपल्या हातात पक्क पकडलं आहे. त्यानंतर अ‍ॅनाकोंडा आणखीनच घाबरतो तो आपलं शेपूट या मच्छिमाराच्या हातातून सोडवण्यासाठी पूर्ण ताकत लावतो अ‍ॅनाकोंडाने पूर्ण ताकद लावण्यानंतर हा मच्छिमार अ‍ॅनाकोंडाचं शेपूट आपल्या हातातून सोडून देतो.

मच्छिमाराच्या हातातून आपलं शेपूट सुटताच अ‍ॅनाकोंडा अधिक गतीनं नदीच्या किनाऱ्याकडे धावतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. एका युजरने म्हटलं आहे की, बरं झालं लवकर सोडलं नाहीतर आज तो वाचला नसता. तर एकानं म्हटलं आहे की, हा अ‍ॅनाकोंडा असा कसा आहे? जो एखाद्या माशा सारखा दिसत आहे. तर आणखी एकानं म्हटलं आहे की, मी हा व्हिडीओ पाहून प्रचंड घाबरलो, तर चौथ्या युजरने लिहिलं आहे की, अ‍ॅनाकोंडाला डिस्टर्ब करणं ही चुकीची गोष्ट आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?