VIDEO : जेव्हा पाकिस्तानी पत्रकार म्हणतो- 'टोमॅटोचं उत्तर आम्ही अणु बॉम्बने देऊ'

मुंबई : “भारताच्या 125 कोटी जनतेने पाकिस्तानवर टोमॅटो बंदी घालून नीच कृत्य केलं आहे. तौबा-तौबा हे अत्यंत नीच कृत्य आहे. या टोमॅटोचं उत्तर आम्ही अणु बॉम्बने देऊ”, असं एका पाकिस्तानी पत्रकाराने आपल्या बातमी पत्रात म्हटलं. विशेष म्हणजे हा पत्रकार त्याच्या प्रत्येक वाक्यानंतर “तौबा-तौबा” म्हणतो आहे. या पत्रकाराचा हा “तौबा-तौबा” व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल …

VIDEO : जेव्हा पाकिस्तानी पत्रकार म्हणतो- 'टोमॅटोचं उत्तर आम्ही अणु बॉम्बने देऊ'

मुंबई : “भारताच्या 125 कोटी जनतेने पाकिस्तानवर टोमॅटो बंदी घालून नीच कृत्य केलं आहे. तौबा-तौबा हे अत्यंत नीच कृत्य आहे. या टोमॅटोचं उत्तर आम्ही अणु बॉम्बने देऊ”, असं एका पाकिस्तानी पत्रकाराने आपल्या बातमी पत्रात म्हटलं. विशेष म्हणजे हा पत्रकार त्याच्या प्रत्येक वाक्यानंतर “तौबा-तौबा” म्हणतो आहे. या पत्रकाराचा हा “तौबा-तौबा” व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

या व्हिडीओमधील हे पत्रकार जम्मू-काश्मिरच्या पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सोशल मीडियावर सध्या या व्हिडीओची खिल्ली उडवली जात आहे. ट्विटरवर हसणाऱ्या, खिल्ली उडवणाऱ्या इमोजीसोबत हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. यांच्या विश्लेषणाचा नेटकऱ्यांमध्ये हाशा पिकला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’चा दर्जा काढून घेतला. त्यानंतर पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर हा रिपोर्ट प्रसारित करण्यात आला.

या व्हायरल व्हिडीओमध्ये हा पत्रकार म्हणतो, “भारताला असं वाटतं की पाकिस्तानी टोमॅटोशिवाय जिवंत राहू शकत नाही. तौबा-तौबा आम्ही हे टोमॅटो त्यांच्या तोंडावर मारतो. आता त्यांचे टोमॅटोही जळणार. आम्ही सव्वाशे कोटी भारतीयांना सांगू इच्छितो की, पाकिस्तान एक अणु देश आहे. आता भारताच्या टोमॅटोचं उत्तर अणु बॉम्बने द्यायची वेळ आली आहे. पंजाबच्या सरकारने तयारी केली आहे. आता आम्ही भारताला टोमॅटोची निर्यात करु. भारताची जनता त्या वेळेपासून जरा घाबरा जेव्हा पाकिस्तान मिसाईल हल्ला करेल, तुम्ही ही  तौबा-तौबा करणार.”

VIDEO : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *