
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाविरोधात कडक भूमिका घेताना दिसले. मात्र, दुसरीकडे त्यांनी रशिया युक्रेन युद्धात शांतता प्रस्ताव ठेवला. रशिया युक्रेन युद्धादरम्यान त्यांनी भारतावर कडक निर्बंध लादत भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, ही भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांची आहे. मात्र, अमेरिकेसह अनेक देशांना मोठा धक्का देत पुतिन दोन दिवसीय भारत दाैऱ्यावर आले. विशेष म्हणजे यादरम्यान तब्बल 7 मंत्र्यांना भारत दाैऱ्यावर पुतिन घेऊन आले. अनेक मोठी करार रशियाने भारतासोबत केली आहेत. भारताची आणि रशियाची मैत्री अख्ख्या जगाने पुन्हा एकदा बघितली. पुतिन यांच्या दाैऱ्याचे शाही नियोजन भारताने केले होते. पुतिन यांनी भारत दाैऱ्यादरम्यान युक्रेन युद्धाबाबत मोठे भाष्य केले होते. भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली असून भारत शांततेच्या बाजूने उभा असल्याचे म्हटले.
युक्रेन रशिया युद्धात डोनाल्ड ट्रम्प शांतता प्रस्ताव ठेवत असून त्यांच्या हाती काहीच लागत नसल्याचे स्पष्ट आहे. युक्रेनने आपल्याला शांतता प्रस्तावात नेमके काय हवे आहे हे अगोदरच अमेरिकेला सांगितले. अमेरिकेने यापूर्वीही एक शांतता प्रस्ताव युक्रेन आणि रशियाला दिला होता. रशियाने तो शांतता प्रस्ताव मंजूर देखील केला. मात्र, युक्रेनने तो शांतता प्रस्ताव आपल्याला मान्य नसल्याचे सांगितेल. रशियाचे नेते व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या भारत भेटीच्या मध्यभागी वॉशिंग्टनची शांतता योजना नाकारली आहे, यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली.
रशियाचे म्हणणे आहे की, युक्रेनमध्ये येणारा डोन्बास प्रदेश आपलाच आहे आणि आपल्याला हवा. यापूर्वीही, पुतिन यांनी अलास्कालाही भेट दिली होती, जिथे ते ट्रम्प यांना भेटले होते. मात्र, तरीही हे युद्ध थांबले नाही. शेवटी अनेक प्रयत्नांनंतर अमेरिकेच्या हाती काहीच लागत नाहीये. अमेरिका शांतता प्रस्तावासाठी युक्रेनवर दबाव टाकत आहे. रशियावरही दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, रशिया अजिबातच अमेरिकेच्या पुढे झुकताना दिसत नाही.
उलट अमेरिकेच्या नाकावर टिच्चून पुतिन भारतात दाखल झाले. फक्त भारतात दाखलच झाले नाही तर त्यांनी थेट महत्वपूर्ण करार भारतासोबत केली. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याने अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात कमी झाली आहे. मात्र, याचा फटका भारताला नाही तर अमेरिकेला बसला. अमेरिकेत हा:हाकार माजला असून थेट किंमती गगणाला पोहोचल्या आहेत.