
अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफच्या निर्णयानंतर जगभरात संतापाचे वातावरण आहे. अनेक देशांनी अमेरिकेच्या या निर्णयाविरोधात भूमिका घेतली. त्याचाच एक भाग म्हणजे चीनमधील शिखर संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे सहभागी होत आहेत. भारत, रशिया आणि चीन एकत्र येत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट सुरू झालाय. बैठकीला सुरूवात होण्याच्या अगोदरच डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन देशांना थेट सांगितले की, भारताचे तेल आणि गॅस तात्काळ थांबवा. बैठकीला सुरूवात होण्याच्या अगोदरच पुतिन यांनी भारताच्या विरोधात धक्कादायक निर्णय घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशाराच दिलाय.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील चीनमध्ये दाखल झाले आहेत. नरेंद्र मोदी आणि पुतिन यांचे चीनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आहे. पुतिन यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफबद्दल थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. आजच्या या बैठकीकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर चीन आणि भारतातील जवळीकता वाढली ही अमेरिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरले आहे.
व्लादिमिर पुतिन यांनी चीनच्या सरकारी माध्यम शिन्हुआला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, चीन आणि रशिया ब्रिक्सला बळकटी देण्यासाठी आणि जगासमोर एक नवीन पर्याय सादर करण्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत. भेदभावपूर्ण निर्बंधांच्या विरोधात आम्ही एकत्र आहोत. यामुळे सदस्य देशांच्या आणि जागतिक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक विकासात अडथळा आणत आहेत, असे म्हणत त्यांनी थेट अमेरिकेवर निशाणा साधला.
पुतिन यांनी पुढे म्हटले की, चीनसोबत मिळून आम्ही ब्रिक्सला जागतिक रचनेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनवत आहोत. आमचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट सदस्य देशांसाठी आर्थिक संधी वाढवणे आणि धोरणात्मक क्षेत्रात भागीदारीसाठी समान व्यासपीठ तयार करणे हे आहे. हे संमेलन 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. बैठकीला सुरूवात होण्यापूर्वीच थेट अमेरिकेला इशारा हा देण्यात आला आहे.