
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे नुकतेच भारताच्या दौऱ्यावर येऊन गेले. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आपल्या रफ-टफ अवतारासाठी पुतिन हे प्रसिद्ध आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांचा जरा वेगळाच अंदाज पहायला मिळला, आत्तापर्यंत त्यांना अशा स्वरूपात खचितच कोणी पाहिलं असेल. आपम प्रेमात पडलोय, अशी कबुली पुतिन यांनी संपूर्ण जगासमोर खुलेआम दिली आहे. त्यांना एका रिपोर्टरने प्रश्न विचारला होता, ते ऐकून आधी पुतिन स्तिमित झाले, थोडे लाजले मग त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि त्यांनी हास्य करतच उत्तर दिलं. पुतिन यांच्या प्रेमाच्या या कबुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला असून, त्यामुळे सर्वच हैराण झालेत.
हसून काय म्हणाले पुतिन ?
रशियाने दीर्घकाळ युद्ध अनुभवले आहे, म्हणून पुतिन हे बरेचवेळा गंभीरपणे बोलताना दिसतात. पण अलीकडेच त्यांची एक वेगळी बाजू उघड झाली, जी फार कमी लोकांना माहीत असेल. एका पत्रकाराने पुतिन यांना गंभीरपणे एक प्रश्न विचारला, ‘तुम्ही म्हणालात की पहिल्या नजरेतील प्रेम खरे असते, तुम्ही कधी प्रेमात पडला आहात का?’ असा सवाल तिने केला. हा प्रश्न ऐकून पुतिन प्रथम लाजले, पण नंतर त्यांनी हसून लगेच उत्तर दिले, ‘हो, मी प्रेमात आहे’. त्यांच्या आयुष्यात कोणीतरी आहे, हे तर पुतिन यांनी स्पष्ट केलं. पण त्याबद्दल पुढे ते फार काही बोलले नाहीत किंवा ते कोणाच्या प्रेमात आहेत, याचा तपशीलही त्यांनी उघड केलेला नाही.
पर्सनल लाइफ ठेवतात सीक्रेट
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नेहमीच त्यांचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवले आहे. अलिकडेच त्यांचे नाव ऑलिंपिक जिम्नॅस्ट अलिना काबाएवाशी जोडले गेले होते, परंतु याची कधीही पुष्टी झाली नाही. पुतिन आणि त्यांची पूर्व पत्नी ल्यूडमिला हे 2013 साली विभक्त झाले. 30 वर्षांच्या लग्नानंतर दोघांनी हे नातं संपवलं. पुतिन आणि ल्यूडमिला यांना दोन मुली असून त्यांचं वय अंदाजे 30 च्या आसपास असल्याचं समजतं. घटस्फोटानंतरही, पुतिन यांनी ल्युडमिलाशी चांगले संबंध ठेवले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलींना एकत्र वाढवलं.
कोण आहे अलिना काबाएवा ?
घटस्फोटानंतर पुतिन याचं ज्या जिम्नॅस्टशी नाव जोडलं गेलं होतं, ती अलिना काबाएवा, 30 वर्षांची आहे आणि तिने सुवर्णपदक जिंकले आहे. तिने 14 जागतिक आणि 25 युरोपियन अजिंक्यपद पदके जिंकली आहेत आणि 2007 मध्ये ती निवृत्त झाली.