AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel War News : युद्ध इराण-इस्रायलच पण…या 3 कारणांमुळे पाकिस्तानचे शहबाज शरीफ टेन्शनमध्ये

Iran-Israel War : इराणने इस्रायलवर शेकडो बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. इराणच्या अणवस्त्र आणि सैन्य तळांवर इस्रायलने जे हल्ले केले, त्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केली. इराणने या ऑपरेशनला 'ट्रू प्रॉमिस 3' नाव दिलं आहे. इस्रायलने जे मिशन सुरु केलय, त्याला ऑपरेशन रायजिंग लायन नाव दिलं आहे.

Iran-Israel War News : युद्ध इराण-इस्रायलच पण...या 3 कारणांमुळे पाकिस्तानचे शहबाज शरीफ टेन्शनमध्ये
Iran-Pakistan-Israel
| Updated on: Jun 14, 2025 | 10:55 AM
Share

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी शुक्रवारी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी इस्रायली हल्ल्याचा बदला घेणार, असं ठणकावून सांगितलं. या दरम्यान इराणने इस्रायलच्या दिशेने शेकडो मिसाइल्स डागली. सैन्य प्रत्युत्तरासाठी तयार आहे असं खामेनेई यांनी सांगितलं. “इस्रायलने हल्ला केला आणि सगळं संपलं असं समजू नका. त्यांच्या या गुन्ह्यानंतर आम्ही त्यांना सुरक्षित राहू देणार नाही” असं अयातुल्ला अली खामेनेई म्हणाले. ही लढाई इराण आणि इस्रायलमधली आहे, पण पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं टेन्शन वाढलं आहे.

इस्रायलच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली. “आम्ही आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्राला आवाहन करतो की, जागतिक शांतता धोक्यात आणणारी कुठलीही घडामोड रोखण्यासाठी तात्काळ पावलं उचला” असं पाकिस्तानने म्हटलं. शहबाज यांनी अशीच ही चिंता व्यक्त केलेली नाही, त्यामागे तीन मोठी कारणं आहेत.

पहिलं कारण

इराणमध्ये यात्रेसाठी गेलेल्या पाकिस्तानी नागरिकांना सुरक्षित परत आणण्याचे पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. पंतप्रधानांच्या निर्देशानंतर उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ पावलं उचलली आहेत. त्यांनी तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाला इराणमधील पाकिस्तानी नागरिकांना सर्व सुविधा प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.

वर्तमान स्थितीत इराणमध्ये 5,000 पाकिस्तानी जायरीन उपस्थित आहेत. सूत्रांनी सांगितलं की, इराणला जाणाऱ्या तीर्थयात्रींची संख्या सतत कमी-जास्त होत असते. बहुतांश यात्रेकरु इराणमधील आपल्या प्रवासात पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क ठेवत नाहीत. संकट परिस्थितीत अशा यात्रेकरुंचा शोध घेणं अवघड होऊन बसतं.

वर्तमान स्थितीत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना इराण आणि इराक दौऱ्याचा पूनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

दुसरं कारण

पाकिस्तान आणि इराणने द्विपक्षीय व्यापार 10 अब्ज डॉलरपर्यंत नेण्यासाठी एक MOU वर स्वाक्षरी केली आहे. मागच्या आर्थिक वर्षात पाकिस्तान आणि इराणमधील व्यापार 2.8 बिलियन डॉलर पर्यंत पोहोचला. पाकिस्तान चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फेडरेशन आणि इराणच्या मशहद चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री दरम्यान एक उच्चस्तरीय बैठकीत MOU वर स्वाक्षरी झाली. बैठकीदरम्यान इराणने व्यापार वीज शुल्क कमी करणं आणि व्यापाराची प्रक्रिया अधिस सहज सोपी करण्याचं पाकिस्तानला आश्वासन दिलं होतं. अशावेळी इराण-इस्रायल युद्ध झाल्यास पाकिस्तानच व्यापार वाढवण्याच स्वप्न धुळीस मिळेल. आधीच ते आर्थिक संकटाचा सामना करतायत.

तिसरं कारणं

पाकिस्तानची सीमा इराणला लागून आहे. त्यांनी जाहीरपणे इराणला साथ दिली नाही, तर इराणसोबतचे संबंध बिघडतील आणि इराणला साथ दिली, तर अमेरिकेची नाराजी ओढवून घ्यावी लागेल.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.