WWE प्रसिद्ध रेसलरचा रिंगमध्येच मृत्यू, प्रेक्षकांना वाटलं मॅचचाच भाग!

लंडन : डब्लूडब्लूई WWE मधील प्रसिद्ध रेसलर सिल्वर किंगचं रिंगमध्येच धक्कादायक निधन झालं. रिंगमध्येच फाईट सुरु असताना सिल्वर किंगचा मृत्यू झाला. WWE या लोकप्रिय कार्यक्रमात खेळत असताना हृदयविकाराचा धक्का आल्याने सिल्वर किंगचा मृत्यू झाला. दुर्दैवाचं म्हणजे जेव्हा हा सर्व प्रकार घडला, तेव्हा हा खेळाचाच एक भाग असल्याचं समजून कुणीही सिल्वर किंगकडे लक्ष दिलं नाही. सिल्वर किंगच्या […]

WWE प्रसिद्ध रेसलरचा रिंगमध्येच मृत्यू, प्रेक्षकांना वाटलं मॅचचाच भाग!
Nupur Chilkulwar

| Edited By: सचिन पाटील

Jul 05, 2019 | 3:38 PM

लंडन : डब्लूडब्लूई WWE मधील प्रसिद्ध रेसलर सिल्वर किंगचं रिंगमध्येच धक्कादायक निधन झालं. रिंगमध्येच फाईट सुरु असताना सिल्वर किंगचा मृत्यू झाला. WWE या लोकप्रिय कार्यक्रमात खेळत असताना हृदयविकाराचा धक्का आल्याने सिल्वर किंगचा मृत्यू झाला. दुर्दैवाचं म्हणजे जेव्हा हा सर्व प्रकार घडला, तेव्हा हा खेळाचाच एक भाग असल्याचं समजून कुणीही सिल्वर किंगकडे लक्ष दिलं नाही. सिल्वर किंगच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

मेक्सिको येथील 51 वर्षीय सेजार बॅरन हा एक WCW चा कुस्तीपटू होता. सिल्वर किंग या नावाने सेजार बॅरनला या कुस्तीक्षेत्रात एक नवी ओळख मिळाली होती. त्याचे जगभरात अनेक चाहते आहेत. लंडनमध्ये गेल्या शनिवारी रात्रीच्या सुमारास ‘द ग्रेटेस्ट शो ऑफ लूचा लिब्रे’ या कार्यक्रमात  सामना सुरु होता. सिल्वर किंग हा गुरेरा या रेसलरविरुद्ध लढत होता. या दरम्यान तो अचानक रिंगमध्ये कोसळला.

त्यावेळी प्रेक्षकांसह  इतरांना हा खेळाचाच एक भाग आहे असं वाटलं. यावेळी गुरेरा हा देखील सिल्वर किंगला खाली दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत होता. कुणालाच सिल्वर किंगला हृदयविकाराचा धक्का आल्याचं समजलं नाही. त्यानंतर काही वेळाने जेव्हा सिल्वर किंग हा रेफ्रीने आवाज दिल्यावरही उठला नाही, तेव्हा डॉक्टरांना रिंगमध्ये बोलवण्यात आलं. त्यानंतर शोच्या आयोजकांनी परिसर रिकामा केला.

या घटनेनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. आयोजकांच्या वागणुकीमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. सिल्वर किंग रिंगमध्ये कोसळ्यानंतर बराच वेळ तो तसाच निपचीत पडून होता. लोकांना तो खेळाचा भाग वाटला. तसेच डॉक्टरांनाही उशिरा बोलवण्यात आलं. यामुळे सिल्वर किंगचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या चाहत्यांकडून आयोजकांवर केला जात आहे.

‘द गार्डियन’ या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, “सिल्वर किंगकडे कुणीही लक्ष देत नव्हतं. हे विचित्र होतं. तो रिंगमध्ये बराच वेळ पडून होता. मात्र, कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, कुणालाही त्याची काळजी नव्हती”, असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

या प्रकरणी कॅमडेन काऊन्सिल या प्रकरणाचा तपास करणार असल्याची माहिती काऊन्सिलच्या प्रवक्त्यांनी दिली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें