
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर बदललेल्या जागतिक समीकरणाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर पुतिन हे येत्या ४ डिसेंबर रोजी भारताच्या भूमीवर पाऊल ठेवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची बैठक होणार आहे. साल २०२२ युक्रेन युद्धानंतर प्रथमच पुतिन भारत भेटीवर येत आहेत. या दौऱ्यात क्रुड ऑईल डील सोबत S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम आणि फ्री ट्रेड एग्रीमेंट देखील बातचित होऊ शकते असे म्हटले जात आहे. यावेळी अफगाणिस्तानात पाकिस्तान आणि अमेरिकेची संभाव्य दखल घेण्यावर देखील चर्चा होऊ शकते.
या दरम्यान पीएम मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या हायप्रोफाईल व्हिजिटच्या आधीच पाकिस्तानने काही कुरापती केल्या आहेत.ज्या रशियाने पकडल्या आहेत. रशियाने पाकिस्तानचा चांगलाच इलाजही सुरु केला आहे. रशियाने सर्वप्रथम भारताविरोधात षडयंत्र रचणाऱ्या पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयवर मोठा हल्ला केला आहे.
रशियाने पाकिस्तानच्या विरोधात मोठी चौकशी सुरु केली आहे. पाकिस्तानच्या एअर स्ट्राईकमध्ये तीन चीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे ही चौकशी सुरु करण्यात आली आहे. जर रशियाला या तपासात पाकिस्तानच्या विरोधात पुरावे सापडले तर चीनही पाकिस्तानला सोडणार नाही.
२८ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानचा शेजारील देश ताजकिस्तानमध्ये एक रहस्यमय एअर स्ट्राईक झाला होता. या हल्ल्यात ताझकिस्तानात काम करणारे तीन चीनी नागरिक ठार झाले होते. पाकिस्तानने लागलीच या हल्ल्याचा आरोपर अफगाणिस्तानवर केला. परंतू अफगाणिस्तानने लागलीच या हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. या हल्ल्या संदर्भात आता अचानक काही असे धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत की त्यात पाकिस्तान अडकत चालला आहे.
या हल्ल्यात पाकिस्तानचा रोल असल्याचे काही पुरावे समोर आल्यानंतर रशिया आणि चीन यांनी या हल्ल्याचा स्वतंत्र तपास सुरु केला आहे. रशियाने असा संशय व्यक्त केला आहे की या हल्ल्यामागे अफगाणिस्तान नव्हे तर पाकिस्तान असू शकतो आणि हे काम पाकिस्तानकडून अमेरिकेने केलेले आहे. वास्तविक अमेरिका अफगाणिस्तान सोबतच आता सेंट्रल आशियाई देशात आपली पकड मजबूत करु इच्छीत आहे. अमेरिका अफगाणिस्तानच्या बगराम एअरबेसवर पुन्हा कब्जा करु इच्छीत आहे. परंतू अफगाणिस्तान भारत, चीन आणि रशियाच्या जवळ गेल्याने अमेरिकेला माघार घ्यावी लागली आहे. अशात अमेरिका सातत्याने अफगाणिस्तानला अस्थिर करण्याच्या प्रयत्नात लागली आहे.