ब्राझीलमध्ये भारताच्या 1000 रुपयांची किंमत किती आहे? वाचा सविस्तर
भारत आणि ब्राझील यांच्यातील जवळीक वाढली आहे. भारत आणि ब्राझीलमधील व्यापारी संबंध खूप मजबूत आहेत. आज आपण या दोन्ही देशांच्या चलनांबाबत माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बऱ्याच देशांवर टॅरिफ लावलेले आहे. भारतावर 25 टक्के तर ब्राझीलवर 50 टक्के कर लादण्यात आलेला आहे. यानंतर ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी ट्र्म्प यांच्याशी न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. मी ट्रम्पला फोन करणार नाही, त्यांना बोलायचे नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी नाही, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलणार. यानंतर आता भारत आणि ब्राझीलमधील व्यापारी संबंधांबाबत चर्चा सुरु झाली आहे.
अमेरिकेने ब्राझीलवर 50 % कर लादला आहे. हा कर पुढील आठवड्यापासून लागू होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरही कर लादला आहे. त्यानंतर आता भारत आणि ब्राझील यांच्यातील जवळीक वाढली आहे. भारत आणि ब्राझीलमधील व्यापारी संबंध खूप मजबूत आहेत. आज आपण या दोन्ही देशांच्या चलनांबाबत माहिती जाणून घेऊयात.
ब्राझीलमध्ये भारताच्या 1000 रुपयांचे मूल्य किती?
एखादा भारतीय व्यक्ती ब्राझीलमध्ये गेला तर त्याला 1000 रुपयांची बदल्यात 62.78 ब्राझिलियन रिअल मिळतील. म्हणजेच 1 रुपया 0.063 ब्राझिलियन रिअलच्या बरोबरीचा आहे. तसे ब्राझिलियन रिअलचे भारतीय रुपयांत रूपांतर केले तर एका ब्राझिलियन रिअलचे 15.93 रुपये मिळतात. याचा अर्थ ब्राझिलियन चलन हे भारतीय रुपयांपेक्षा खूपच महाग आहे.
ब्राझिलियन राष्ट्राध्यक्षांनी ब्रिक्स देशांकडे मागितली मदत
टॅरिफमुळे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. त्यामळे लुईझ इनासियो लुला दा सिल्वा हे ब्रिक्स देशांशी संपर्क साधत आहेत. त्यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना फोन केला आहे. अमेरिकेच्या दबावाचा सामना करण्यासाठी ब्राझीलला काही देशांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे ते महत्वाच्या देशांच्या प्रमुखांना फोन करत आहेत.
भारत आणि ब्राझीलमधील व्यापार
भारत आणि ब्राझीलमधील व्यापारी संबंध खूप जुने आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमध्ये 12.20 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 1लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला. भारताने ब्राझीलला 6.77 अब्ज डॉलर्स (60 हजार कोटी रुपये) किमतीच्या वस्तू विकल्या, तर भारताने ब्राझीलमधून 5.43 अब्ज डॉलर्स (47 हजार कोटी रुपये) किमतीच्या वस्तू खरेदी केल्या आहेत.
