AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो तोच निघाला! स्वत:ला येशू मसिहा समजतो, या आधीही… व्हाइट हाऊसच्या हल्लेखोराबाबतची मोठी अपडेट समोर

अमेरिकेच्या व्हाइट हाऊसबाहेर गोळीबाराने खळबळ उडवली आहे. नसीर बेस्ट नावाच्या हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात तो जखमी होऊन नंतर मरण पावला. धक्कादायक म्हणजे, नसीर स्वत:ला 'येशू मसिहा' समजत होता आणि त्याला मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या. यापूर्वीही त्याने व्हाइट हाऊसवर हल्ला करण्याची धमकी दिली होती.

तो तोच निघाला! स्वत:ला येशू मसिहा समजतो, या आधीही... व्हाइट हाऊसच्या हल्लेखोराबाबतची मोठी अपडेट समोर
Donald Trump Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 24, 2026 | 9:35 AM
Share

अमेरिकेच्या राष्ट्रपती भवन म्हणजे व्हाइट हाऊसच्या बाहेर गोळीबार करण्यात आला आहे. अमेरिकन वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. 21 वर्षीय नसीर बेस्ट असं हल्लेखोराचं नाव आहे. त्याने व्हाइट हाऊसच्या सुरक्षा रक्षकांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून सीक्रेट सर्व्हिसनेही गोळीबार केला. त्यात तो जखमी झाला. जखमी नसीरला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता या हल्लेखोराबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कसा झाला हल्ला?

अमेरिकन वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर हा हल्ला झाला. 17वी स्ट्रीट आणि पेनसिल्वेनिया अॅवेन्यू NW या ठिकाणी हा गोळीबार झाला. व्हाइट हाऊसपासून हाकेच्या अंतरावर हा परिसर आहे. हा सुरक्षा रक्षकांचा चेक पॉइंटचा परिसर आहे. सीक्रेट सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या बॅगेतून बंदूक काढली आणि अधिकाऱ्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्याने जवळपास 20 ते 30 राऊंड फायरिंग केली. त्यानंतर प्रत्त्युत्तर म्हणून सुरक्षा रक्षकांनीही गोळीबार केला. या हल्ल्यात एक वाटसरूही जखमी झाला आहे.

आधीही पकडले होते

अमेरिकन मीडियानुसार, नसीर बेस्ट पहिल्यापासून सीक्रेट सर्व्हिसच्या रडारवर होता. त्याने या पूर्वीही व्हाइट हाऊसवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे व्हाइट हाऊस नसीरच्या रडारवर होते, हे स्पष्ट झाले आहे. फॉक्स न्यूजच्या मते, 26 जून 2025 रोजी त्याने एजेंट्सला थांबवून कथितपणे धमक्या दिल्या होत्या. 10 जुलै 2025 रोजी तो प्रतिबंधित परिसरात घुसण्याच्या आरोपावरून पकडला गेला होता. न्यूयॉर्क पोस्टच्यानुसार, नसीरला मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या आहेत. तर काही मीडिया रिपोर्टनुसार, तो स्वत:ला येशू मसिहा समजत होता. व्हाइट हाऊसपासून दूर राहण्याचे कोर्टाने त्याला आदेशही दिले होते. दरम्यान, आता त्याने हल्ला का केला? याची माहिती अजून समोर आलेली नाही.

पत्रकार काय म्हणाले?

हल्ला झाला तेव्हा व्हाइट हाऊस परिसरात काही पत्रकार होते. त्यांनी आपबिती सांगितली. आम्ही गोळीबाराचा आवाज ऐकला. एबीसी न्यूजची रिपोर्टर सेलिना वांग त्यावेळी व्हिडीओ रेकॉर्ड करत होती. ती म्हणाली की, मी अचानक गोळीचा आवाज ऐकला. आम्ही सर्व घाबरून प्रेस ब्रिफिंग रुममध्ये लपलो. तर, एका कॅनेडियन पर्यटकाच्या मते, त्याला असं वाटलं की 20 ते 25 फटाके फुटले. नंतर कळलं गोळीबार झाला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ