डोनाल्ड ट्रम्प यांचे गुरु कोण आहेत? त्यांच्याच सल्ल्याने भारतावर लादला 50% कर

ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लागला आहे. मात्र तुम्हाला हे माहिती नसेल की ट्रम्प हे बरेच निर्णय दुसऱ्याच्या सल्ल्याने घेतात. आज आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुरुंबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

डोनाल्ड ट्रम्प यांचे गुरु कोण आहेत? त्यांच्याच सल्ल्याने भारतावर लादला 50% कर
Trump and Navarro
| Updated on: Aug 19, 2025 | 11:07 PM

गेल्या काही काळापासून संपूर्ण जगात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चर्चा आहे. कारण ट्रम्प यांना बहुतांशी देशांवर टॅरिफ लावले आहे. यामध्ये चीन, ब्राझील आणि कॅनडा या बड्या देशांचाही यात समावेशा आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेला आपला मित्र मानणाऱ्या भारतावरही 50 टक्के कर लागला आहे. मात्र तुम्हाला हे माहिती नसेल की ट्रम्प हे बरेच निर्णय दुसऱ्याच्या सल्ल्याने घेतात. आज आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुरुंबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

व्यापार सल्लागार पीटर नवारो हे डोनाल्ड ट्रम्प यांचे गुरु आहेत. ते अनेक सल्ले डोनाल्ड ट्रम्प यांना देत असतात. फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामागे पीटर नवारो हे आहेत. नवारो यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. नवारो यांना असे वाटत होते की, यामुळे रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यासाठी भारतावर दबाव निर्माण होईल आणि युक्रेनशी युद्ध करणाऱ्या रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याची संधी मिळेल. कारण टॅरिफ लादताना ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा इशारा भारताला दिला होता.

अमेरिकेचा भारतावर 50 % कर

नवारो यांना भारत हा देश रशिया आणि चीन दोघांच्याही जवळीक निर्माण करत आहे. तसेच भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून रशियाच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. यामुळे रशियाला युक्रेनशी युद्ध करण्यास ताकद मिळत आहे. ही खरेदी थांबवण्यासाठी अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला आहे.

नवारो कोण आहेत?

नवारो हे ट्रम्प यांच्या ‘ट्रेड वॉर’ धोरणाचे जनक आहेत. ते वादग्रस्त आणि ध्रुवीकरण करणारे व्यक्ती मानले जातात. ते पूर्वी प्राध्यापक होते, मात्र नंतर व्यापार सल्लागार बनले. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी केलेली आहे. ते कॅलिफोर्निया विद्यापीठ, इर्विन येथे प्राध्यापक होते. त्यांची चीनविरोधी विचारसरणी 2011 च्या ‘डेथ बाय चायना’ या पुस्तकातून उघडपणे समोर आली होती. यामध्ये त्यांनी चीनवर बेकायदेशीर निर्यात अनुदान, चलन फेरफार आणि इतर आरोप केले होते. त्यांनी 2012 मध्ये एक डॉक्युमेंट्री बनवली होती.

ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार

डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांनी डेथ बाय चायना हे पुस्तक वाचले, त्यानंतर नवारो यांना ट्रम्प सरकारमध्ये व्यापार सल्लागार बनले. त्यांनी आक्रमक टॅरिफ पॉलिसी बनवली. ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणामागेही नवारो यांची कल्पना आहे. नवारो हे खूप आक्रमक आहेत, त्यामुळे अनेकदा त्यांचा सहकाऱ्यांशी वाद देखील होत असतो.