AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स? जिला हॉटेलात बोलावून डोनाल्ड ट्रम्प फसले; काय आहे प्रकरण?

पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्ससोबत असलेल्या कथित संबंधामुळे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर हश मनीसह 34 आरोप ठेवण्यात आले आहेत.

कोण आहे पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स? जिला हॉटेलात बोलावून डोनाल्ड ट्रम्प फसले; काय आहे प्रकरण?
Stormy DanielsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 07, 2023 | 6:33 AM
Share

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे एका पॉर्न स्टारशी असलेल्या कथित संबंधामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. आता जानेवारी 2024 पासून या प्रकरणावर नियमित सुनावणी होणार आहे. पॉर्न स्टारशी अफेअर असणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहे. जिच्यासोबत त्यांचे नाव जोडले आहे ती पोर्न स्टार आहे स्टॉर्मी डेनियल्स असं आहे. ट्रम्प यांच्यासोबत नाव जोडल्या गेल्याने स्टॉर्मीही चर्चेत आली आहे.

काय आहे प्रकरण

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बिझनेस रेकॉर्ड चुकीचं ठरवण्यासाठी गुंडगिरी केल्याचे 34 आरोप आहे. तसेच 2016च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्स हिला तिच्याशी असलेलं अफेयर लपवण्यासाठी (हश मनी) पैसे दिल्याचा आरोप आहे. डॅनियल्सला तोंड बंद ठेवण्यासाठी 130,000 डॉलर कथित नुकसान भरपाई म्हणून दिल्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी हे संबंध उघड झाल्यास प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याने ट्रम्प यांनी ही रक्कम मोजल्याचं सांगितलं जात आहे.

ट्रम्प यांनी 2006मध्ये डॅनियल्स सोबत संबंध ठेवले होते. विशेष म्हणजे पहिली पत्नी मेलानिया असताना त्यांनी हे संबंध ठेवले होते. ट्रम्प यांचे प्लेबॉय मॉडेल करेन मॅकडॉगल हिच्याशी संबंध होते. हे संबंध लपवण्यासाठी त्यांनी करेनला पैसे दिले होते. तसेच ट्रम्प टॉवरच्या एका माजी डोरमॅनलाही आवाज बंद ठेवण्यासाठी हश मनी दिल्याचा आरोप आहे.

कोण आहे स्टॉर्मी

स्टॉर्मी डेनियल्सचा जन्म लुसियानाच्या बॅटन रूज येथे 17 मार्च 1979 रोजी झाला. तिचं खरं नाव स्टेफनी ग्रेकरी क्लिफोर्ड असं आहे. निक्की सिक्स वरून तिच्या नावाचा शॉर्टफॉर्म करण्यात आला आहे. तिने पहिल्यांदा स्ट्रिपर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ती 17 वर्षाची होती आणि शाळेत जात होती. पॉर्न स्टार होण्यापूर्वी तिने बॅटन रुजच्या गोल्ड क्लबमध्ये एक स्ट्रिपर आणि डान्सर म्हणून काम केले होते. डॅनियल एक उत्कृष्ट नर्तकी आहे. इतर नर्तकींपेक्षा तिचं नृत्य वेगळच आहे. ती आठवड्यातून सहा दिवस काम करायची. दुपारी 3 वाजता क्लब उघडायचा. तेव्हा ती कामावर हजर असायची. रात्री 2 वाजता क्लब बंद होईपर्यंत ती क्लबमध्ये असायची.

अॅडल्ट सिनेमात काम

2002मध्ये तिने अॅडल्ट सिनेमात कारण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिने हीट नावाचा एक सिनेमाही केला होता. फिल्मी इंडस्ट्रीत ती रुळली. लोकप्रियता मिळाली. 2004पर्यंत तिने अनेक पुरस्कार पटकावले. अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. अनेक शोही केले. लोकप्रिय संगीत व्हिडीओ आणि अमेरिकेच्या कॉमेडी सिनेमातही तिने प्रमुख पाहुणी म्हणून काम केलं.

लैंगिक शोषण, चार विवाह

‘फुल डिस्क्लोजर’ या पुस्तकात डेनियलने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या संबंधाचा खुलासा केला आहे. ट्रम्प यांनी हॉटेलात बोलावलं होतं, असं तिने म्हटलं आहे. तिने आपल्या या पुस्तकातून अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर तिचं पालनपोषण एका बाईने केलं. वयाच्या 9व्या वर्षीच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले होते, असंही तिने पुस्तकात म्हटलंय. डॅनियलचे चार विवाह झालेले आहेत. तिला एक मुलगीही आहे. तिने 2009मध्ये अमेरिकेच्या सिनेटची निवडणूक लढण्याचा आणि 2010मध्ये लुसियाना सिनेट सीट लढवण्याची घोषणा केली होती.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....