AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

France Nahel : कोण होता ‘नाहेल’, ज्याच्या मृत्यूने धुमसतंय फ्रान्स

France Nahel : एका तरुणाच्या मृत्यूमुळे सध्या फ्रान्स जळत आहे. राजधानी पॅरिसच नाही तर आसपासच्या अनेक उपनगर, शहरांमध्ये हा वणवा पेटला आहे. कोण होता नाहेल, त्याच्या मृत्यूमुळे का पेटलंय फ्रान्स

France Nahel : कोण होता 'नाहेल', ज्याच्या मृत्यूने धुमसतंय फ्रान्स
| Updated on: Jul 01, 2023 | 6:10 PM
Share

नवी दिल्ली : फ्रान्सची राजधानी पॅरिस हे प्रेमाची प्रतिक मानण्यात येते. अनेक तरुणांचं प्रेम येथे फुलतं.  पण गेल्या तीन दिवसांपासून हे शहर आगीत झोकल्या गेले आहे. रस्त्यावर जमाव आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरु आहे. 17 वर्षांचा नाहेल (Nahel Death) याच्या मृत्यूमुळे फ्रान्समध्ये जाळपोळ सुरु आहे. पॅरिस, उपनगरं आणि इतर शहरात हिंसेचे प्रकार सुरु आहेत. दंगल भडकली आहे. गेल्या दशकातील ही सर्वात मोठी हिंसा (France Riots) असल्याचा दावा करण्यात येत आहे. आंदोलनकर्ते बेछुट गोळ्या झाडत आहेत. तर पोलिस त्यांना काबूत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आंदोलकांनी अनेक ठिकाणी लुटपाट सुरु केली आहे. सरकारी आणि खासगी संपत्तीला आग लावण्याचे प्रकार सुरु आहेत. कोण होता नाहेल, त्याच्या मृत्यूमुळे हा रक्तरंजित प्रकार सुरु आहे. फ्रान्स धुमसतंय.

मंगळवारी झाला मृत्यू फ्रान्समध्ये पोलिसांनी गोळी झाडल्याने 17 वर्षीय नाहेलचा मंगळवारी मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात हिंसा उसळली. सरकारी संपत्ती, पोलीस स्टेशनवर हल्ले सुरु झाले. एवढंच नाही तर खासगी आस्थापना, मॉल्स, दुकाने यांना लक्ष करण्यात आले. अनेक ठिकाणी लुटपाटीच्या घटना घडल्या. आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये चकमकी उडाल्या. पण गेल्या तीन दिवसांपासून परिस्थिती अजून ही आटोक्यात आली नाही.

थेट घातली गोळी वाहतूक सुरळीत करताना नोहेल याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. त्यावरुन भडकलेल्या पोलिसाने त्याच्या डोक्यात गोळी झाडली. यामध्ये 17 वर्षांचा नाहेलचा मृत्यू झाला. यासंबंधीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे सर्वच लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी हिंसक आंदोलन केली. आतापर्यंत या दंगलीत 1 हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणात दोषी पोलिसाला अटक करण्यात आली आहे. पण फ्रान्समधील हिंसा काही थांबली नाही.

कोण होता नाहेल Nahel M हा टेकअलवे डिलिव्हरी ड्रायव्हर होता. तो एकुलता एक होता. त्याला रग्बी खेळणे आवडत होते. तो पायरेट्स ऑफ रग्बी क्लबचा सक्रिय सदस्य होता. अभ्यासात गती नसल्याने त्याने इलेक्ट्रिशियन व्हायचं मनाशी पक्क केले होते आणि त्यासाठी एका महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. रग्बी हेच त्याचे प्रेम होते. या खेळासाठी तो नेहमी वेळ काढत होता.

आईचा आरोप काय अल्जेरिया मुळचे असल्यानेच पोलिसांनी मुलावर थेट गोळी झाडल्याचा आरोप नाहेलच्या आईने केला आहे. त्याचा चेहरा पाहुनच पोलिसांनी त्याला गोळी मारली. हा वंशवाद असल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. तर त्याच्या वकिलाने भडकलेल्या हिंसेवर प्रतिक्रिया दिली. हिंसक आंदोलन सोडून नाहेल याला न्याय मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन वकिलाने केले आहे.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.