सर्वात मोठी बातमी! नरेंद्र मोदी आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांची बैठक, 40 मिनिटे महत्वाची, पुतिन यांनी..

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारत, चीन आणि रशिया एकत्र आले आहेत. या तिन्ही देशांमध्ये महत्वाची बैठक पार पडत आहे. पुतिन आणि नरेंद्र मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर आहेत. यावेळी टॅरिफबद्दल मोठी निर्णया होण्याची दाट शक्यता आहे.

सर्वात मोठी बातमी! नरेंद्र मोदी आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांची बैठक, 40 मिनिटे महत्वाची, पुतिन यांनी..
Narendra Modi Jinping Putin
| Updated on: Aug 31, 2025 | 9:37 AM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आणि उद्या चीनच्या दाैऱ्यावर आहेत. फक्त नरेंद्र मोदीच नाही तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे देखील चीनमध्ये आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत, रशिया आणि चीन एकत्र आल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर बैठकीच्या अगोदरच पुतिन यांनी थेट मोठा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांच्यात अगदी काही वेळात बैठक होईल. ही बैठक 40 मिनिटे चालणार आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांनंतर नरेंद्र मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर गेले आहेत. अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयानंतर दोन्ही देशांमध्ये चांगलीच जवळीकता वाढल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे.

नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यातील बैठक भारतीय वेळेनुसार 9.30 ला सुरू होईल. या बैठकीतील मुख्य मुद्दा हा फक्त आणि फक्त अमेरिकेने भारतावर लावलेला टॅरिफ हा आहे. पुतिन, नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात बैठक होणार आहे. त्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात बैठक होईल. त्यामध्ये भारत आणि चीनमधील सीमा संघर्ष यावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनमध्ये मोठा चीन संघर्ष बघायला मिळाला.

ज्यावेळी भारतावर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावले त्यावेळी चीन हे देखील अमेरिकेच्या विरोधात मैदानात उतरला. अमेरिकेने म्हटले की, भारतावर टॅरिफ लावण्याचे मुख्य कारण म्हणजे ते रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहेत. रशियाकडून तेल खरेदी करून त्यांना पैसा पुरवत आहेत. रशिया या पैशांचा वापर युक्रेन युद्धासाठी करत आहे आणि युक्रेनच्या निष्पाप लोकांचे जीव घेतले जात आहेत. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा शांतीचा रस्ता हा दिल्लीहून जातो, असे त्यांनी म्हटले.

चीन हा रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा देश आहे. मात्र, अमेरिकेकडून चीनवर टॅरिफ लावला नाही. शिवाय त्यांना 90 दिवसांचा वेळ दिला असून यामधून पर्याय काढण्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत. यावरून अमेरिकेची दुटप्पी भूमिका स्पष्ट होताना दिसत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावला आहे. मात्र, अमेरिकेसमोर भारत हा झुकला नाहीये.