AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट, पुतिन यांचा थेट इशारा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीपूर्वीच झटका, अमेरिकेचा ताण..

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सातत्याने जगभरातून टीका केली जात आहे. त्यामध्येच चीनमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. रशियाचे तेल खरेदी न करण्यासाठी अमेरिका भारतावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकताना दिसत आहे. मात्र, या काळात रशिया भारतासोबत उभा आहे. शिवाय आता थेट डोनाल्ड ट्रम्प यांना मोठी चेतावणीच दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट, पुतिन यांचा थेट इशारा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीपूर्वीच झटका, अमेरिकेचा ताण..
Donald Trump vladimir putin and narendra modi
| Updated on: Aug 31, 2025 | 8:59 AM
Share

अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफच्या निर्णयानंतर जगभरात संतापाचे वातावरण आहे. अनेक देशांनी अमेरिकेच्या या निर्णयाविरोधात भूमिका घेतली. त्याचाच एक भाग म्हणजे चीनमधील शिखर संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे सहभागी होत आहेत. भारत, रशिया आणि चीन एकत्र येत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट सुरू झालाय. बैठकीला सुरूवात होण्याच्या अगोदरच डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन देशांना थेट सांगितले की, भारताचे तेल आणि गॅस तात्काळ थांबवा. बैठकीला सुरूवात होण्याच्या अगोदरच पुतिन यांनी भारताच्या विरोधात धक्कादायक निर्णय घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशाराच दिलाय.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील चीनमध्ये दाखल झाले आहेत. नरेंद्र मोदी आणि पुतिन यांचे चीनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आहे. पुतिन यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफबद्दल थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. आजच्या या बैठकीकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर चीन आणि भारतातील जवळीकता वाढली ही अमेरिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरले आहे.

व्लादिमिर पुतिन यांनी चीनच्या सरकारी माध्यम शिन्हुआला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, चीन आणि रशिया ब्रिक्सला बळकटी देण्यासाठी आणि जगासमोर एक नवीन पर्याय सादर करण्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत. भेदभावपूर्ण निर्बंधांच्या विरोधात आम्ही एकत्र आहोत. यामुळे सदस्य देशांच्या आणि जागतिक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक विकासात अडथळा आणत आहेत, असे म्हणत त्यांनी थेट अमेरिकेवर निशाणा साधला.

पुतिन यांनी पुढे म्हटले की, चीनसोबत मिळून आम्ही ब्रिक्सला जागतिक रचनेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनवत आहोत. आमचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट सदस्य देशांसाठी आर्थिक संधी वाढवणे आणि धोरणात्मक क्षेत्रात भागीदारीसाठी समान व्यासपीठ तयार करणे हे आहे. हे संमेलन 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. बैठकीला सुरूवात होण्यापूर्वीच थेट अमेरिकेला इशारा हा देण्यात आला आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.