इराणच्या हल्ल्यांनंतर अरब देश ताकही फुंकून का पित आहेत ? अशी कोणती मजबूरी ?

इराणने इन्फ्रास्ट्रक्चरलवर केलेल्या लागोपाटच्या हल्ल्यानंतरही अरब देश तोंड दाबून बुक्क्यांचा मार का खात आहेत? ते इराणला सडेतोड उत्तर का देत नाहीत. या मागे काय आहे त्यांची मजबूरी ?

इराणच्या हल्ल्यांनंतर अरब देश ताकही फुंकून का पित आहेत ? अशी कोणती मजबूरी  ?
Iran-Israel-US war
| Updated on: Mar 02, 2026 | 9:01 PM

इराण- इस्राईल-US  युद्धामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. जवळपास ३५० उड्डाणे रद्द झाली आहेत. शेकडो भारतीय दुबईसह आखाती प्रदेशात अडकून पडली आहेत. या युद्धात इराणने शेजारील मुस्लीम राष्ट्रांना टार्गेट केले आहे. रियाद पासून दुबईत आकाशात ड्रोन आणि मिसाईलच्या आवाजाने अरब देशांची झोप उडाली आहे. इराणने म्हटले आहे की आम्ही अरब देशातील अमेरिकन तळांना टार्गेट करत आहोत. परंतू इराण इन्फ्रास्ट्रक्चरचे नुकसान करताना ऑईल आणि गॅस इंडस्ट्रीला टार्गेट करत आहे. तरीही अरब देश निषेध करण्यापलिकडे इराणविरोधात मोठी कारवाई करण्यास धजत नाहीएत. काय आहे या मागे कारण ?

युएईत शारजाह, दुबई, अबू धाबीच्या विमानतळांना आणि हॉटेलना इराण टार्गेट करत आहे. आज सोमवारी दुपारी सौदी अरबमधील तानुरातील अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर इराणने हल्ला केल्याचे वृत्त आले आहे. काही वेळानंतर कतारच्या मोठ्या गॅस प्लांटवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्न येत आहे की अरब देश इराणचा निषेध करण्याच्या पलिकडे कोणतेही पाऊल का उचलत नाहीएत. इराणला सौदी अरब सारखे बलाढ्य देश प्रत्युत्तर का देत नाहीएत ?

ताकही फूंकून पित आहेत

युएईने अलिकडेच इराणमधून त्यांच्या राजदूताला माघारी बोलावले आहे. परंतू युद्धाची घोषणा केलेली नाही. युएई सारखे सौदी अरब, कतार, बहारीन आणि कुवैत सारखे देश देखील त्यांच्यावर इराणने हल्ला केल्यानंतरही ताकही फूंकून फूंकून पित आहेत. कारण ते जाणत आहेत की त्यांनी आज एक चुकीचे पाऊल उचलले तर संपूर्ण मध्य-पूर्वेचा नकाशा बदलायला वेळ लागणार नाही.

व्हीलन ठरु नये म्हणून ?

इराणच्या हल्ल्यानंतरही अरब देश तोंड दाबून बुक्क्यांचा मार का खात आहेत. या मागे त्यांची कमजोरी नसून मोठे राजकारण दडलेले आहे. सर्वात मोठी चिंता ‘इस्लामिक उम्मा'( मुस्लीम समुदाय ) त विभाजनाची आहे. जर अरब देशांनी इराणवर थेट हल्ला केला तर थेट शिया- सुन्नी संघर्षाची ठिणगी उडू शकते. इराणला हे माहिती आहे की त्याला केव्हा कर्बला ची आठवण करुन द्यायची आहे. अरब देशांना भीती सतावत आहे की जनतेच्या नजरेत आपण व्हीलन ठरु नये ?

इस्राईलच्या विरोधात प्रचंड संताप

दुसरीकडे अमेरिका आणि इस्राईल सोबत याच्या ताळमेळची जठिलता आहे. अरब देशांना असे दाखवून देणे धोक्याचे आहे की ते अमेरिकेचे वा इस्राईलच्या हातातील बाहुल्या आहेत.कारण मुस्लीम जगतात इस्राईलच्या विरोधात प्रचंड संताप आहे. अरब शासकाने ते माहिती आहे. खास करुन गाझापट्टीत जो नरसंहार झाला त्याविरोधात तरी अरब देश अमेरिका आणि इस्राईलच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी पुढाकार घेतील अशी मुस्लीम जगताला आशा आहे. त्यामुळे अरब देशाच्या नेतृत्वाला भीती आहे की जर त्यांनी अमेरिका आणि इस्राईलच्या बाजूने इराणवर मोठी सैन्य कारवाई केली तर सर्वसाधारण जनतेच्या नजरेतून आपण घसरु अशी चिंता आहे.

तर युद्धाची व्याप्ती वाढू शकते

दुसरीकडे इराणच्या बाजूने सहानुभूती आहे. इराण स्वत:ला पाश्चात्य साम्राज्यवादाच्या विरोधात लढणारा मसीहा म्हणून सादर करत आला आहे. जर अरब देशांनी त्याच्यावर हल्ला केला तर इराण यास अन्याय आणि पाश्चात्यांची गुलामी असे म्हणून सहानुभूती मिळवू शकतो. अरब देश इराणला हा फायदा मिळू देऊ इच्छीत नाहीत. मात्र, अरब देश कुठपर्यंत शांत राहणार असा सवाल केला जात आहे. परंतू इराणने जर मर्यादा ओलांडून तेथील जनतेवर थेट हल्ला केला तर मात्र अरब देशांची मजबूरी संपूर्ण युद्धाची व्याप्ती वाढू शकते. तसेच अरब देश सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून आहेत. त्यांना असे वाटले की अमेरिका इराकवर कारवाई करण्यास चालढकल करीत आहे तर मात्र अरब देश स्वत:च्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलतील.

Follow Us