नव्वदी गाठलेल्या दलाई लामांना चीन का घाबरतो?, लामांना आश्रय दिल्याने चीनशी शत्रूत्व वाढले ?
तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांचा नुकताच ९० वा वाढदिवस साजरा झाला, ते आपला उत्तराधिकारी जाहीर करणार असे म्हटले जात होत. परंतू तसे काही त्यांनी केले नाही.चीन त्यांना का वचकून असतो. त्यांना आश्रय कोणत्या परिस्थिती देण्यात आला याची कहाणी....

तिबेटचे सर्वोच्च बौद्ध धर्मगुरु दलाई लामा ६ जुलै रोजी नव्वदीचे झाले आहेत. ते आपला उत्तराधिकारी जाहीर करणार असे म्हटले जात होते. पंरतू त्यांनी आपला उत्तराधिकारी काही जाहीर केलेला नाही. चीन आता तिबेटमध्ये स्वत:चा लामा जाहीर करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतात तिबेटी धर्माचे हे १४ वे लामा धरमशाला गेल्या सहा दशकांपासून येथे राहात आहेत. भारतात त्यांना खूप मानसन्मान दिला जातो. तिबेटच्या धार्मिक,सांस्कृतिक आणि राजकीय अस्मितेचे ते प्रतिक आहेत. वास्तविक दलाई लामा एक पदवी आहे. ज्याचा अर्थ ज्ञानाचा सागर. दलाई लामा यांचे खरे नाव तेनजिन ग्यात्सो आहे. दलाई लामा हिमाचल प्रदेशातील...
